“आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही”; अरुंधतीपुढे नवं संकट

Aai Kuthe Kay Karte: घरादाराला धुडकावून बाहेर पडलेली बाई पुरुषांना संधी तर बायकांना धोकादायक वाटतात?

आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही; अरुंधतीपुढे नवं संकट
Madhurani PrabhulkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 2:57 PM

आपल्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांच्या घरातून अरुंधती (Arundhati) कायमस्वरुपी बाहेर पडली आहे. मात्र बाहेरचं जग तिला मोकळ्या मनाने स्वीकारायला अजूनही तयार नाही. एकट्या बाईला भाड्याने घर द्यायला, जागा द्यायला लोकं फार खळखळ करत असल्याची तक्रार आशुतोष (Ashutosh) त्याच्या आईकडे करतो. हे ऐकून आशुतोषची आई त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगते. त्याचप्रमाणे आपल्या समाजात एकट्या बाईने राहणं सोपं का नाही, हे सांगते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत या घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही,” हा आशुतोषच्या आईच्या तोंडी असलेला संवाद म्हणजे सणसणीत चपराकच आहे. आता अरुंधतीपुढे असलेल्या या नव्या समस्यांचा सामना ती कशी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही. एकवेळ तिचा नवरा गेलेला असला तर ठीक आहे, पण नवरा सोडून आलेली बाई म्हणजे तिच्याच काहीतरी भयंकर प्रॉब्लेम असणार असं गृहितच धरतात. यालाच घाबरून अनेक बायका मनाविरुद्ध संसार करतात, वर्षानुवर्षं सोसत राहतात. एकटीनं राहण्यासाठी वेगळी शक्ती लागते आणि कुठल्याच अर्थाने ते सोपं नाहीये,” अशा शब्दांत आशुतोषची आई त्याला अरुंधतीची बाजू समजावून सांगते. हे सांगत असताना एखाद्या बाईला सहानुभूती किंवा दया नाही तर तिच्याकडे नॉर्मल व्यक्ती म्हणून समाजाने बघावं, एवढीच तिची अपेक्षा असते, हे त्या अधोरेखित करतात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अनिरुद्ध आणि कांचन देशमुख यांना त्यांची चूक समजेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.

संबंधित बातम्या: ‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

संबंधित बातम्या: गालावर खळी, डोळ्यांत धुंदी.. ‘आई कुठे काय करते’मधल्या ‘अरुंधती’चा मोहक अंदाज

संबंधित बातम्या: एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.