गाद्या टाका आता, देशमुखांच्या घरात रंगलेल्या खेळानं खेळाडूच बोर झाले? ‘हम आपके है कौन’ ची आठवण झाली?
घरात लग्नसमारंभ आणि देशमुख कुटुंब धमाल करणार नाही, हे शक्य तरी आहे का?? अशीच काहीशी धमाल आता ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत दिसत आहे. देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात सध्या अभिषेक-अनघाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
मुंबई : घरात लग्नसमारंभ आणि देशमुख कुटुंब धमाल करणार नाही, हे शक्य तरी आहे का?? अशीच काहीशी धमाल आता ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत दिसत आहे. देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात सध्या अभिषेक-अनघाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या दरम्यान सगळं देशमुख कुटुंब एकत्र येऊन धमाल करताना दिसत आहे. मात्र, देशमुख कुटुंबात आता नितीन आणि आशुतोषची देखील एण्ट्री झाल्याने एक नवा सामना देखील पाहायला मिळत आहे.
सध्या मालिकेतील खेळ पाहून प्रेक्षकांना मात्र, सुरज बडज्याताची एखादी रोमँटिक फिल्म सुरु आहे का, असा प्रश्न पडला आहे. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है..’ असे सगळेच चित्रपट आणि त्यातील रोमँटिक सिन्स डोळ्यासमोर ठेवून मालीकेच चित्रीकरण सुरु असल्याचा भास होत आहे.
खेळ की नुसताच रोमान्स?
देशमुखांच्या घरात आता चक्क रुमाल पाणी हा खेळ आयोजित करण्यात आला होता. ‘आई कांचन’ विरुद्ध ‘अप्पा’ अशी टीम देखील निवडली गेली. आता या दोन्ही टीममध्ये रुमाल उचलण्याचा खेळ रंगणार आहे. यात पहिली जोडी आली ती म्हणजे यश आणि गौरी. या दोघांच्या खेळात रुमाल राहिला खालीच, पण ‘आंखो ही आंखो मे…’ म्हणत हे लव्हबर्ड्स मात्र दुसऱ्याच विश्वात रमलेले दिसले. यावेळी अप्पांना मध्ये पडत दोघांना जागं करावं लागलं. यानंतर जोडी आली आज्जी आणि अप्पांची. यात आपल्या हुशारीने आणि मनी उर्सेकरच्या नावाचा वापर करत बाजी आई कांचन यांनी जिंकली. नंतर जोडी आली अनघा आणि अभिची.. यातही चक्क ‘आय लव्ह यु’ म्हणत अनघाने रुमाल पळवला आणि अभिला ते कळलं देखील नाही.
पहिली गोष्ट म्हणजे खेळाच्या दोन्ही विरुद्ध टीममध्ये बरोबर जोड्याच कशा समोर आल्या? म्हणजे एखादी जोडी खेळणं अगदी योगायोग वाटू शकतो. मात्र, प्रत्येक वेळी तेच घडणं बऱ्याचदा पचनी पडत नाही. तर, खेळ बाजूला राहून, नुसता ‘हम आपके है कौन’चा रोमान्स दिसल्याने चक्क देखमुख कुटुंबीयच वैतागलेले दिसले. ‘गाद्या टाका आता’, असं म्हणत त्यांनी अनेक टोमणे देखील लगावले.
View this post on Instagram
मालिकेच्या सध्या सुरु असलेल्या ट्रॅकमध्ये बऱ्याचदा 90’च्या रोमान्स फिल्मच्या आयडिया डोकावताना दिसतात. इतकच नाही तर, मालिकेच्या पार्श्वभूमीलादेखील अशीच काही गाणी देखील ऐकू येतात. काही दृश्यानंमध्ये या गोष्टी ठीक वाटतील, मात्र सतत जर याची पुनरावृत्ती झाली तर प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी देखील लेखक आणि निर्मात्यांना घ्यावी लागणार आहे.