Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!

अंकिताने खोटेपणा करून केवळ हा बनाव केल्याची शक्यता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. तर, आता यशने देखील अभिला अंकिताने हे केवळ नाटक केले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अभिने देखील अंकिताची कानउघडणी करत, जर या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर, त्याक्षणी घरातून बाहेर निघून जा, असे बाजावले आहे.

Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 4:01 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रेक्षकांची आवडती मालिका ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले होते. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, आता अंकिताच्या रुपाने नवीन वादळ धडकलं आहे. अभि-अनघाचं लग्न मोडत अंकिताने अभिषेकला आपल्याशी लग्न करायला भाग पाडलं आहे. या दरम्यान गायब झालेली अनघा पुन्हा एकदा मालिकेत दिसली आहे (Aai Kuthe Kay Karte serial latest update Anagha re enter in serial).

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

अंकिताचा बनाव उघड होणार?

मात्र, आता अंकिताने खोटेपणा करून केवळ हा बनाव केल्याची शक्यता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. तर, आता यशने देखील अभिला अंकिताने हे केवळ नाटक केले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अभिने देखील अंकिताची कानउघडणी करत, जर या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर, त्याक्षणी घरातून बाहेर निघून जा, असे बाजावले आहे. सध्या यश, अभि आणि शेखर मिळून या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.

दरम्यान अंकिता खोटंबोलत असून, ती स्वतः आईसोबत चालत हॉस्पिटलमध्ये गेल्याचे शेखरला कळले आहे. तर, त्याने देखील तातडीने या गोष्टी अरुंधती, यश आणि अभि यांच्या कानावर घातल्या आहेत. दुसरीकडे अंकिताने आपलं बिंग फुटू नये म्हणून सासऱ्याला अर्थात अनिरुद्धला नोकरीची धमकी दिली आहे.

अनघाची एंट्री

अभिशी होणारा साखरपुडा मोडल्याने अनघा तडक गावाहून मुंबईला निघून आली होती. यानंतर ती मालिकेत पुन्हा दिसली नव्हती. यामुळे ती परतणार की नाही याकडे सगळ्याच प्रेक्षकांच्या नजर लागल्या होत्या, अखेर नुकत्याच प्रदर्शित भागात अनघाची एंट्री झाली आहे. अरुंधती अनघाला फोन करून बागेत भेटण्यासाठी बोलावते आणि तिची हात जोडून माफी मागते.

अंकिताचं भविष्य काय?

एकीकडे मालिकेत अनघाची वापसी झाली आहे, तर दुसरीकडे अंकिताचा खोटेपणा देशमुख कुटुंबासमोर उघड होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंकिता अभिच्या आयुष्यातून निघून जाऊन अनघा परत येणार का? अर्थात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Aai Kuthe Kay Karte serial latest update Anagha re enter in serial)

हेही वाचा :

एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’

Heennaa Panchaal | ‘ती निर्दोष असल्याने, कोणाचीही भीती नाही’, ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या हीना पांचाळला बहिणीचा पाठींबा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.