Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीला अपशब्द बोलणाऱ्या मेहताच्या श्रीमुखात भडकवणार संजना, ‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार स्त्रीशक्ती!

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते आहे. मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. एकीकडे मालिकेत सण उत्सव साजरे केले जात आहेत, तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीला अपशब्द बोलणाऱ्या मेहताच्या श्रीमुखात भडकवणार संजना, ‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार स्त्रीशक्ती!
Aai kuthe kay karte
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 2:30 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते आहे. मालिकेत सध्या अनेक घटना घडत आहेत. एकीकडे मालिकेत सण उत्सव साजरे केले जात आहेत, तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेत आता संजना तिचा बॉस मेहता याला चांगलाच धडा शिकवताना दिसणार आहे.

आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला घाबरून न जाता त्या विरोधात हिमतीने लढण्यासाठी अरुंधतीने संजनाला विश्वासाचं बळ दिलं. तर, आता आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत संजना आणि अरुंधती मेहताला चांगलाच धडा शिकवणार आहेत.

पाहा नवा प्रोमो :

मेहताचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी अरुंधती आणि देशमुख कुटुंब संजनाला साथ देणार आहे. तर, यावेळी अरुंधतीला वाईटसाईट बोलून तिच्यावर हात उचलायला गेलेल्या मेहताला संजना जोरदार थप्पड देणार आहे.

नेमकं काय झालं?

देशमुखांच्या घरात अनिरुद्धची नोकरी गेली आहे. तर. संजानाशी लग्न केल्यामुळे आता संजनाची देखील नोकरी गेली आहे. आपली नोकरी परत मिळवण्यासाठी संजना जीवाचा आटापिटा करत आहे. आपल्या कामाचा विचार व्हावा म्हणून कंपनीचा बॉस मेहता याला भेटायला गेलेल्या संजनाला एका वेगळ्याच प्रसंगाला समोर जावं लागतं. कामाच्या बदल्यात तू माझ्यासोबत कॉम्प्रोमाईज करावं अशी ऑफर मेहता संजनाला देतो. इतकेच नव्हे तर, तो तिच्यावर अनेक आरोप देखील करतो. या सगळ्याला घाबरून संजना घरी निघून येत. हा प्रकार अरुंधतीला कळल्यावर ती संजनाला मेहता विरोधात लढण्याचा सल्ला देते. मालिकेच्या येत्या काही भागात प्रेक्षकांना महिला शक्तीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे.

देशमुखांच्या घरात अनघाची एंट्री होणार!

अभिला माफ करत अनघाने पुन्हा एकदा अभिची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच मालिकेत अभि आणि अनघा यांच्या लग्नाचा मोठा सोहळा दिसंरा आहे. इतकंच नव्हे तर, या लग्नाला घरातील सगळेच लोक उत्सुक आहेत. या आधी या जोडीचा साखर पुडा मोडला होता. अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

हेही वाचा :

अभय देओल पुन्हा प्रेमात? सोशल मीडियावर शेअर केले रोमँटिक फोटो, पाहा कोण आहे ही खास व्यक्ती…

Myra : सुंदर हावभाव आणि नटखट अंदाज, ‘माझी तुझी रेशीमगाठ’मालिकेतील परीचा क्यूट अंदाज

Bhool Bhulaiyaa 2 Teaser : ‘भूल भुलैया 2’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, कार्तिक आर्यनचा जबरदस्त लूक पाहून चाहते उत्सुक!

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.