Aai Kuthe Kay Karte | एकीकडे भावनिक गुंतागुंत, दुसरीकडे रूढी-प्रथांशी वाकडं, देशमुखांच्या घरात संजना पुन्हा एकदा ठरणार वादाचं निमित्त!  

संजना दीक्षित आता देशमुखांच्या घरात येऊन संजना अनिरुद्ध देशमुख बनली आहे. तर, दुसरीकडे अति मुक्त विचारांच्या संजनाला अवघ्या दोनच दिवसांत आता देशमुखांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे विचार पटेनासे झाले आहेत. यावरून पुन्हा एकदा घरात वादाचं वातावरण निर्माण होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | एकीकडे भावनिक गुंतागुंत, दुसरीकडे रूढी-प्रथांशी वाकडं, देशमुखांच्या घरात संजना पुन्हा एकदा ठरणार वादाचं निमित्त!  
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 2:24 PM

मुंबई : संजना दीक्षित आता देशमुखांच्या घरात येऊन संजना अनिरुद्ध देशमुख बनली आहे. तर, दुसरीकडे अति मुक्त विचारांच्या संजनाला अवघ्या दोनच दिवसांत आता देशमुखांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे विचार पटेनासे झाले आहेत. यावरून पुन्हा एकदा घरात वादाचं वातावरण निर्माण होणार आहे. या वादाला पुन्हा एकदा निमित्त ठरणार आहे संजनाचा आडमुठेपणा…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे.

पुरुष पहिले का जेवणार म्हणून घालणार वाद!

संजनाने देशमुखांच्या घरातील कृष्णजन्मोत्सवाच्या पूजेला बसण्यासाठी हट्ट घराला. तर, या पूजेला बसण्यासाठी तिने दिवसभर उपवास देखील धरला. मात्र, रात्री या पूजेनंतर घरातील पुरुषांना पहिल्या पंगतीत जेवण वाढले गेले. यावरून संजनाला राग आला. अर्थात पुरुषच पहिले का जेवणार, म्हणून संजनाने वाद घालायला सुरुवात केली. हे देशमुखांचं घर अगदीच मागासलेल्या विचारांचं आहे असं म्हणत तिने हा वाद उकरून काढला आहे. यावरून संजना आणि केदारमध्ये देखील तूतू-मैमै झाली. मात्र, पुन्हा एकदा अरुंधतीने या सगळ्यामध्ये पडत, संजनाला खडे बोल सुनावले आणि वाद देखील शमवला आहे.

निखिलच्या येण्याने वाढणार भावनिक गुंतागुंत

संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात येणार आहे. याचवेळी घरात गोकुळाष्टमी निमित्ताने ‘कृष्ण जन्म’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या पूजेला बसण्यासाठी संजना घरातल्यांचं मन वळवणार आहे. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लहानग्या निखिलला आता प्रश्न पडलाय की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? हा प्रश्न विचारत तो अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगतो. अर्थात घडल्या प्रकारची त्याला काहीच कल्पना नाहीय. यामुळे आता त्याला उत्तरं कशी द्यायची, हा मोठा प्रश्न संजना आणि अनिरुद्ध समोर उभा राहणार आहे.

अरुंधती झाली ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे.

संजनाला भरला सज्जड दम

मालिकेच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अरुंधती संजनाला चांगलाच दम भरताना दिसली आहे. सकाळची काम उरकण्यासाठी अरुंधतीची लगबग सुरु असते. यावेळी ती अनिरुद्धच्या बेडरूम जवळ येते. आणि अचानक त्याचवेळी अनिरुद्ध देखील दरवाजा उघडतो. त्यावेळी संजना तिला तू मुद्दाम आमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होतीस, असं म्हणते. त्यावर अप्पांनी हे घर माझ्यानावावर देखील केलं आहे, असं म्हणत, या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!, असा दम अरुंधती संजनाला भरते. यानंतर आता देशमुखांच्या घरात अरुंधती विरुद्ध संजना असा नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!

‘यंदाचा उन्हाळा होणार सनी’, ललित प्रभाकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.