अरुंधती पुन्हा देशमुखांचं घर सोडणार की ‘समृद्धी’तच नांदणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट!

संजनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी झालेल्या वादानंतर अनिरुद्धच्या आईला स्ट्रोक आला आहे. रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

अरुंधती पुन्हा देशमुखांचं घर सोडणार की ‘समृद्धी’तच नांदणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 12:23 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे.

अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे. संजना माप ओलांडणार इतक्यात अनिरुद्धची आई या दोघांना गरात येण्यापासून रोखते. याचवेळी झालेल्या तु-तु-मै-मै दरम्यान आईंना चक्कर येते. इतक्यात अनिरुद्ध गळ्यातील हार काढून आईकडे धाव घेतो. इतक्यात बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत येते आणि तिच्या पायाने ते माप ओलांडले जाते. यामुळेच आता लग्न जरी संजनाचं झालं असलं तरी, गृहप्रवेश मात्र पुन्हा अरुंधतीचाच झाला आहे.

अनिरुद्धची आई रुग्णालयात दाखल

संजनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी झालेल्या वादानंतर अनिरुद्धच्या आईला स्ट्रोक आला आहे. रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी तातडीने रुग्णवाहिका बोलावून देशमुख कुटुंबाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी घरी निघून चालेली अरुंधतीची पावले पुन्हा ‘समृद्धी’कडे वळली आहेत. आई आजारी असताना आता पुन्हा अरुंधती देशमुखांच्या घरात थांबणार आहे.

आई परत आल्या की मी त्यांना सगळं त्यांच्या आवडीचं करून देणार आहे, असं अरुंधती विमलला सांगते. मात्र, त्यावर विमल तिला त्यासाठी तुम्ही घरात राहायला हवं, असं म्हणते. यावर आता अरुंधती काय निर्णय घेणार आणि ती पुन्हा ‘समृद्धी’तच नांदणार का? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मानत निर्माण झाले आहेत. लवकरच मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे. यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे.

मालिकेत सध्या काय सुरुये?

मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. या नंतर आता संजनाने देखील शेखरपासून घटस्फोट मिळवला आहे. यानंतर तिने घाईनेच अनिरुद्धसोबत संसार देखील थाटला आहे. पण हा संसार नेमका कसा चालणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे.

हेही वाचा :

एकमेकांची साथ 25 वर्षांचा संसार, अनिरुद्ध आणि अरुंधती पुन्हा असे कधी हसतील का?, पाहा मिलिंद गवळींची खास पोस्ट

सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…

जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.