एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामधील वाद चव्हाट्यावर, छोट्या भाईजानने केला धक्कादायक खुलासा
बिग बॉस 16 ने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. बिग बॉस 16 चा फिनाले होऊनही बरेच दिवस झाले आहे. मात्र, असे असतानाही बिग बॉस 16 चे सदस्य चर्चेत आहेत. नुकताच अब्दू रोजिक याने मुंबईमध्ये नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
मुंबई : बिग बॉस 16 ने टीआरपीमध्ये धमाल केली. बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चे सीजन अत्यंत खास ठरले. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन देखील झाले. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 16 चा फिनाले पार पडला. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अनेकांना वाटत होते की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बॉस 16 चा विजेता होईल. मात्र, जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असल्याने एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाला.
विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात घरी मैत्री बघायला मिळाली. या मैत्रीला मंडली असे नाव अर्चना गाैतम हिने दिले. बिग बॉसचे घर असे आहे, जिथे दरदिवशी नाते बदल राहतात. मात्र, याला फक्त आणि फक्त मंडली अपवाद राहिली. कारण बिग बॉस 16 च्या शेवटच्या दिवसापर्यंत मंडलीमधील प्रेम प्रेक्षकांना दिसत होते.
साजिद खान, शिव ठाकरे, अब्दू रोजिक, एमसी स्टॅन, सुंबुल ताैकीर आणि निम्रत काैर हे बिग बॉस 16 च्या मंडलीमधील सदस्य. विशेष म्हणजे बिग बॉस 16 मध्ये प्रत्येक टास्क हे मिळून खेळताना दिसले. इतकेच नाहीतर अब्दू रोजिक हा शो सोडून जाताना ढसाढसा रडताना मंडलीमधील सदस्य दिसले.
बिग बॉस 16 चा फिनाले झाल्यानंतर मंडली धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी देखील मंडलीला खूप जास्त प्रेम दिले. मात्र, नुकताच अब्दू रोजिक याचे बोलणे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याचे कळत आहे. यावर अब्दू रोजिक याने भाष्य केले.
अब्दू रोजिक हा लाईव्ह सेशन एमसी स्टॅन याच्याबद्दल बोलताना दिसला. अब्दू रोजिक म्हणाला की, लोक मला सतत एमसी स्टॅन याच्याबद्दल विचारत असतात. जेव्हा मी एमसी स्टॅन याला कॉल करतो तेव्हा तो मला सलाम किंवा हाय वगैरे करत नाही. एमसी स्टॅन हा माझा फोन उचलत नाही.
पुढे अब्दू रोजिक म्हणाला, मी कधी एमसी स्टॅनबद्दल वाईट बोलू शकतो असे तुम्हाला खरोखर वाटते का? बिग बॉसमध्ये जेव्हाही तो दु:खी होता, तेव्हा मी त्याच्यासोबत होतो. आता तो मीडियामध्ये म्हणतोय की मी त्याला माझ्या गाण्याचे प्रमोशन करायला सांगत आहे. तो असे का करत आहे. माझे डोके दुखत आहे, त्या बातम्या पाहून मला राग येतोय.