Abdu Rozik | अखेर त्या वादावर अब्दु रोजिक याने दिले रोखठोक उत्तर, म्हणाला तो प्रकार माझ्या आई-वडिलांना देखील…

| Updated on: Jan 31, 2023 | 8:50 PM

अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर तो सर्वांचे केंद्रबिंदु बनला होता. बिग बाॅसच्या घरामधील आणि बाहेरही सर्वच अब्दु रोजिक याला लाईक्स करत होते.

Abdu Rozik | अखेर त्या वादावर अब्दु रोजिक याने दिले रोखठोक उत्तर, म्हणाला तो प्रकार माझ्या आई-वडिलांना देखील...
Follow us on

मुंबई : बिग बाॅस १६ हे चांगलेच रंगात आले असून घरामध्ये स्पर्धेक धमाल करताना दिसत आहेत. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) चा फिलाने अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी, अर्चना गाैतम, निम्रत काैर, सुंबुल ताैकीर आणि शालिन भनोट हे स्पर्धेक आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात धमाल करणारा अब्दु रोजिक हा काही कारणामुळे बाहेर पडला आहे. मात्र, चाहते असूनही बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक याला मिस करत आहेत. बिग बाॅसच्या इतिहासामधील अब्दु रोजिक (Abdu Rozik) हा एकमेंव स्पर्धेक आहे जो बिग बाॅसच्या घराबाहेर गेल्यानंतर घरातील सर्वच सदस्य रडताना दिसले. अब्दु रोजिक याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. अब्दु रोजिक हा एक इंटरनॅशनल स्टार असून अब्दु हा कजाकिस्तानचा गायक असून तो दुबईमध्ये राहतो. अत्यंत कमी वयामध्ये अब्दु रोजिक याने पैशांसोबतच नाव देखील कमावले आहे. आज भारतामध्येही अब्दु रोजिक याचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.

अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर तो सर्वांचे केंद्रबिंदु बनला होता. बिग बाॅसच्या घरामधील आणि बाहेरही सर्वच अब्दु रोजिक याला लाईक्स करत होते. अब्दु रोजिक याच्यासाठी खास एक छोटी खुर्ची बिग बाॅसने दिली होती.

बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिक असताना साजिद खान, शिव ठाकरे, निम्रत काैर, एमसी स्टॅन आणि सुंबुल ताैकीर यांच्यासोबत खास रिलेशन होते. साजिद खान आणि शिव ठाकरे यांच्यासोबत अब्दु रोजिक याने खूप मस्ती केली आहे.

अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घरात असताना निम्रत काैर हिला लाईक करत होता. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घराबाहेर गेल्यावर मी माझ्या मनातील भावना या निम्रतला सांगणार असल्याचे थेट अब्दु रोजिक याने सांगितले होते.

यावर साजिद खान आणि शिव ठाकरे यांनी अब्दु रोजिक याला काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. यादरम्यान बिग बाॅसच्या घरात असताना निम्रत काैरचा वाढदिवस होता.

यावेळी अब्दु रोजिक याने पाठीवर I Love You Nimrat असे लिहिण्यास सांगितले होते.
I Love You Nimrat हे न लिहिता साजिद खान याने अब्दु रोजिक याच्या पाठीवर थेट आय लव टट्टी असे लिहिले होते. त्यावर अब्दु रोजिक याच्या टीमने मोठा आक्षेप देखील घेतला होता.

आता यावर अब्दु रोजिक याने मोठे विधान केले आहे. यावर अब्दु रोजिक म्हणाला की, माझ्या पाठीवर आय लव टट्टी हे लिहिल्याने माझे आई- वडिलही नाराज झाले होते. मनीष पॉल याच्या पॉडकास्टमध्ये अब्दु रोजिक याने हे सांगितले.