Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरात अब्दू निम्रतला करतोय फ्लर्ट

बिग बॉस 16 मध्ये सुंबुल आणि शालिनचा लव्ह अॅंगल समोर आला होता. मात्र, टीनाने सुंबुलला हळूहळू शालिनपासून दूर केले.

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरात अब्दू निम्रतला करतोय फ्लर्ट
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 10:14 AM

मुंबई : शहनाज गिल आणि सिध्दार्थ शुक्लाच्या लव्ह स्टोरीनंतर (Love story) बिग बॉसच्या घरात आलेले सदस्य शोमध्ये अधिक काळ टिकण्यासाठी लव्ह अॅंगल तयार करताना दिसत आहेत. मात्र, हे फार काळ टिकू शकत नाहीये. टीना दत्ताने शोमध्ये राहण्यासाठी बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये शालिनसोबत लव्ह स्टोरी तयार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र, दोन दिवसांपूर्वीच टीना आणि शालिनमध्ये तडाख्याचे भांडण (Quarrel) झाले. टीना फक्त हे शोसाठी करत असल्याचे शालिनच्या लक्षात आल्यावर शालिन टीनापासून चार हात लांबच राहणे पसंत करतोय.

बिग बॉस 16 मध्ये सुंबुल आणि शालिनचा लव्ह अॅंगल समोर आला होता. मात्र, टीनाने सुंबुलला हळूहळू शालिनपासून दूर केले. त्यानंतर शालिन आणि टीनाची जवळीकता वाढली. मात्र, टास्कदरम्यान टीना फक्त हे सर्वकाही शोसाठी करत असल्याचे शालिनच्या लक्षात आले आणि त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली.

बिग बॉसच्या घरातील सर्वांचा आवडता स्पर्धेक अर्थात अब्दूलाही आता घरातील एका मुलीवर प्रेम झाले आहे. विशेष म्हणजे ही दुसरी तिसरी कोणी  नसून निम्रत काैर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरातील सदस्य निम्रतच्या नावाने अब्दूला चिडवताना दिसत आहेत. जेंव्हा जेंव्हा अब्दूला निम्रतच्या नावाने चिडवले जाते, त्यावेळी ती माझी मैत्रिण असल्याचे अब्दू सांगतो.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अब्दू चक्क निम्रतला फ्लर्ट करताना दिसतोय. छोट्याशा अब्दूच्या या करामती त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. निम्रत जिकडे जात आहे तिकडे छोटा अब्दू तिच्या मागे फिरत आहे. निम्रत मेकअप करत असताना देखील अब्दू तिच्या समोरच बसून राहतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.