भूमिकेसाठी कायपण! अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री!

सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) या मालिकेत ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची भूमिका साकारत असून, ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे.

भूमिकेसाठी कायपण! अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री!
अजिंक्य देव
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 6:55 AM

मुंबई : स्टार प्रवाहवर 26 जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ (Jai Bhavani Jai Shivaji) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) या मालिकेत ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची भूमिका साकारत असून, ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे (Actor Ajinkya Deo cut his hair for Bajiprabhu Deshpande role in Jai Bhavani Jai Shivaji).

नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून, सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर, अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

पहिल्यांदाच केसांना लावली कात्री!

अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले. ‘एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का? याची भीती देखील होती. मात्र, माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे. इतिहासावरच्या प्रेमापोटीच हे शक्य झालं आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं, तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं, असं मला वाटतं’, अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.

भूमिका साकारण्यासाठी उत्सुक!

बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खुपच उत्सुक आहेत. ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे.

या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.’

(Actor Ajinkya Deo cut his hair for Bajiprabhu Deshpande role in Jai Bhavani Jai Shivaji)

हेही वाचा :

Jai Bhavani Jai Shivaji | भुषण प्रधान साकारणार ‘छत्रपती शिवाजी महाराज’, तर अजिंक्य देव दिसणार ‘बाजीप्रभू’ देशपांडेंच्या भूमिकेत!

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.