Video : ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ती’ स्टाईल शहनाजची, अल्लू अर्जुनने तर कॉपी केलीय, खरं नाही वाटत?, व्हिडीओ बघाच…!

अल्लू अर्जुनची त्याच्या दाढीखालून हात फिरवतानाची स्टाईल अफलातून आहे. परंतु ती त्याची स्वत:ची ओरिजिनल स्टेप्स नाही किंवा चित्रपटातील कुणाचीही सिग्नेचर स्टेप्स नाही. तर ती शैली अल्लूने शेहनाजपासून प्रेरित होऊन केली असल्याचं प्रेक्षक म्हणत आहे.

Video : 'पुष्पा' सिनेमातील 'ती' स्टाईल शहनाजची, अल्लू अर्जुनने तर कॉपी केलीय, खरं नाही वाटत?, व्हिडीओ बघाच...!
शहनाज गिल, अल्लू अर्जुन
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 3:28 PM

मुंबई : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचं भारतीय सिनेरसिकांच्या मनावर गारुड आहे. दक्षिण भारतीय सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला करण्याबरोबरच हे सिनेमे सिनेरसिकांच्या मनात घर करत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या नुकताच रिलीज झालेला आणि मोठ्या स्क्रीनवर दिमाखात मिरवणारा सिनेमा पुष्पा (pushpa the rise). पुष्पाने चाहत्यांच्या मनात घर करण्याचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड मोडलेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण हा सिनेमा फक्त दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर देशभर या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमातील गाणी, त्यातले डायलॉग, सिनेमातील स्टेप्स, अगदी रसिक प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. अल्लूची (Allu Arjun) दाढीच्या खालून हात फिरविण्याची स्टाईल तर अफलातून आहे. तरुणांना या स्टाईलने वेड लावलंय. पण त्याने ही स्टाईल बिग बॉस फेम शहनाज गिलची (bigg boss fame Shehnaaz Gill) कॉपी केलीय. तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा व्हिडीओ पाहाच…….!

शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या हनुवटीच्या खालून हात फिरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ बिग बॉसच्या घरातील आहे. तिच्यासमोर कुणीतरी बसलेलं दिसून येत आहे. त्याला बोलत असताना शेहनाजने तिच्या हनुवटीवरुन हात फिरवला आहे. हीच स्टेप अल्लू अर्जुनने कॉपी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

अल्लू अर्जुनने तर शहनाजची कॉपी केलीय!

अल्लू अर्जुनची त्याच्या दाढीखालून हात फिरवतानाची स्टाईल अफलातून आहे. परंतु ती त्याची स्वत:ची ओरिजिनल स्टेप्स नाही किंवा चित्रपटातील कुणाचीही सिग्नेचर स्टेप्स नाही. तर ती शैली अल्लूने शहनाजपासून प्रेरित होऊन केली असल्याचं प्रेक्षक म्हणत आहे.

शहनाजचा व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणत आहे की, शहनाज गिलने 2019 मध्येच पुष्पा रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनच्या त्या सिग्रेचर स्टेप्सचा शोध लावलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळतायत.

शहनाज गिलची खास ओळख

बिग बॉस फेम शहनाज गिल अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये नुकतीच शहनाज गिल दिसली होती. शहनाजने होस्ट सलमान खानसोबत खूप मस्ती केली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी तिने शेअर केल्या. सिद्धार्थ आणि शहनाजची खूप घट्ट मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे असंख्य किस्से आहेत. परंतु सिद्धार्थने अकाली एक्झिट घेतली. दरम्यानच्या काळात शेहनाज उन्मळून पडली होती. आता कुठे ती सावरत आहे.

संबंधित बातम्या

Gangubai Kathiwadi : बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, दोन तासात दीड मिलियन पार

कालच लग्नाचा वाढदिवस साजरा, आज पोस्टर शेअर करत रितेश-जिनिलियाची ‘गुडन्यूज’

Madhubala | मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं, 96 व्या वर्षी वणवण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.