सुनील ग्रोवरला रुग्णालयातून डिस्चार्ज, कपिल शर्माकडून आस्थेने विचारपूस, काळजी घेण्याचा सल्ला
सुनील ग्रोवरचा अनेक वर्षापासूनचा मित्र अभिनेता कपिल शर्माने सुनीलच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. मी सुनीलला मेसेज केला आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसंच काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं कपिल शर्माने सांगितलं.
मुंबई : कॉमेडी अभिनेता सुनील ग्रोवरच्या (Comedian Sunil Grover) नुकतीच हृदयावर नुकतीच शस्त्रक्रिया (bypass surgery) झाली. त्याच्यावर बायपास सर्जरी झाली आहे. जवळपास 5 दिवस तो रुग्णालयात होता. त्याल आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो घरी विश्रांती घेत आहेत. त्याचा गेल्या अनेक वर्षापासूनचा मित्र अभिनेता कपिल शर्माने (Sunil Grover) सुनीलच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. मी सुनीलला मेसेज केला आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली, असं कपिल शर्माने सांगितलं.
सुनीलच्या ऑपरेशनविषयी कळताच मला धक्का बसला
कपिल आणि सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ज्यात सुनीलने ‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ची भूमिका केली होती. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा म्हणाला “सुनीलची बातमी ऐकून मला धक्का बसला होता. मी सुनीलच्या तब्येतीबद्दल खूप काळजीत होतो. मी त्याला मेसेज केला होता पण त्याला परवाच डिस्चार्ज मिळाला होता, त्यामुळे मी त्याच्याकडून मेसेजची अपेक्षा करु शकत नाही. अगदी लहान वयातच त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली, पण तो लवकरच बरा होईल, अशी अपेक्षा करुयात”
“मी एका कॉमन मित्राकडून सुनीलच्या तब्येतीची माहिती घेतली आहे. आम्ही दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहोत, त्यामुळे आमचे अनेक कॉमन मित्र आहेत. हे सर्वजण मला सुनीलच्या तब्येतीचे अपडेट्स देत आहेत. तो ठीक आहे, आम्ही सर्वजण त्याच्या तब्येतीची काळजी घेत आहोत. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे दोघेही 2017 मध्ये वेगळे झाले. काही मतभेदांमुळे सुनीलने कपिलचा शो सोडला. मात्र, दोघेही चांगले मित्र आहेत.
कपिल शर्मा पुढे म्हणाला, “येणारा महिना माझ्यासाठी व्यस्त असणार आहेत. माझा संपूर्ण दिवस शूटिंग आणि फिट राहण्यात जातो, जे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.” कपिल सध्या त्याच्या नेटफ्लिक्सवरील शो ‘कपिल शर्मा: आय एम नॉट डन यट’मुळे चर्चेत आहे.
सुनीलवर मुंबईत शस्त्रक्रिया
मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये (Asian Heart Institute) सुनीलच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. रिपोर्टनुसार सुनील ग्रोवरच्या हृदयात ब्लॉकेज होते आणि त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. शूटिंगमुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती.
सुनील ग्रोव्हरची ओळख
“मी सुरुवातीपासूनच मिमिक्री करण्यात चांगला होता. मला अभिनयाची आवड होती. लोकांना हसवायला मला सुरुवातीपासूनच आवडत असे. मला आठवतं, मी बारावीत होतो, तेव्हा मी नाटक स्पर्धेत भाग घेतला होता. प्रमुख पाहुण्यांनी मला सांगितले की मी त्यात भाग घेऊ नये, कारण बाकीच्यांवर अन्याय होईल. मी थिएटरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, अभिनयासाठी मुंबईला शिफ्ट झालो. त्यानंतर खूप मेहनत घेतली. अखेर कष्टाचं फळ मला मिळालं”, असं सुनील म्हणाला होता.
संबंधित बातम्या