Kanishka Soni | ‘या’ टीव्ही अभिनेत्रीने स्वतःशीच केले लग्न, ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर…
कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावरती शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, स्वतःशी लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि मी एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करते. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीने स्वतःशीच लग्न (Marriage) केले आहे. नुकताच कनिष्का सोनीने (Kanishka Soni) खुलासा केला आहे की तिने स्वतःशी लग्न केले असून ती खूप आनंदी आहे. स्वतःशीच लग्न केल्यानंतर कनिष्काने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून आता हे फोटो (Photo) चर्चेचा विषय ठरत आहेत. कनिष्का सोनीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने सिंदूर आणि मंगळसूत्र घातलेले स्पष्ट दिसते आहे. फोटो शेअर करताना कनिष्काने कॅप्शनही दिले आहे. मात्र, कॅप्शनचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसलायं.
इथे पाहा कनिष्का सोनीने शेअर केलेली पोस्ट
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न करून सोशल मीडियावर शेअर केले फोटो
कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावरती शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, स्वतःशी लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि मी एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करते. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे. मला कधीच माणसाची गरज भासली नाही… मी नेहमीच अविवाहित राहिले आणि मला एकटे राहण्यात आनंद होतो. मी देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि शक्ती सर्व काही माझ्या आत आहे, धन्यवाद…अशी पोस्ट फोटोसोबत कनिष्काने शेअर केलीयं.
ट्रोल करणाऱ्यांसाठी कनिष्काने केली खास पोस्ट शेअर
कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केल्याचे उघड होताच तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. यानंतर अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करताना ट्रोल झाल्याबद्दल सांगितले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्या स्वत: च्या लग्नाच्या निर्णयावर बरेच प्रश्न उपस्थित करत आहात, माझा भारतीय संस्कृतीवर खरोखर विश्वास आहे आणि हे माझे मत आहे की, मी अविवाहित राहणे निवडले आहे. लग्न म्हणजे लैंगिक संबंध नसून ते प्रेम आणि प्रामाणिकपणाबद्दल आहे, ज्याची प्रत्येकाला इच्छा असते. पण यावर माझा विश्वास नाहीयं.