Depression | ही अभिनेत्री होती चक्क इतके वर्षे डिप्रेशनमध्ये, अखेर कारण आले पुढे, म्हणाली…
सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात देखील निक्कीचे नाव आले होते. निक्कीचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
मुंबई : निक्की तंबोली कायमच चर्चेत असते. बिग बाॅस १४ मध्ये निक्कीने धमाका केला होता. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर निक्कीच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. बिग बाॅसच्या घरात विषय कोणताही असो निक्की तंबोली (Nikki Tamboli) आपले मत मांडताना कोणाचाही विचार करत नव्हती. बिग बाॅसच्या घरात असताना निक्की आणि रूबिना दिलैकमध्ये खास मैत्री झाली होती. सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात देखील निक्कीचे नाव आले होते. निक्कीचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, निक्कीने काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट केले होते की, मला सुकेशने कोणतेच गिफ्ट वगैरे दिले नाहीत. एका चित्रपटासाठी तो माझ्या संपर्कात आला होता. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे आता परत एकदा निक्की चर्चेत आलीये.
सुकेश चंद्रशेखर याने आपल्याला एका चित्रपटाची आॅफर दिल्याचे काही दिवसांपूर्वी निक्की तंबोली हिने सांगितले. अशी एक चर्चा होती की, निक्की तंबोली ही सुकेश चंद्रशेखर याला भेटण्यासाठी दिल्लीतील तुरूंगामध्ये देखील गेली होती.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निक्की तंबोली हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. इतकेच नाहीतर बिग बाॅस १४ मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अनेक आॅफर आल्याचे देखील निक्की तंबोली हिने सांगितले.
परंतू आॅफर येत असूनही निक्की फक्त खतरो के खिलाडी याच शोमध्ये दिसली होती. याचे कारण आता निक्की तंबोली हिने सांगितले आहे. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्की खूप जास्त तणावामध्ये होते.
निक्की तंबोली डिप्रेशनमध्ये गेली होती. 4 मे 2021 रोजी कोरोनाची लागण झाल्याने निक्कीचा भाऊ जतिन तंबोली याने जगाचा निरोप घेतला. यामुळे निक्की पूर्णपणे तुटली होती. माझ्यासाठी स्वत: ला सांभाळणे खूप अवघड होऊन गेले असल्याचे निक्कीने म्हटले.
गेली दोन वर्ष माझ्यासाठी खूप जास्त अवघड होती. मला अनेक आॅफर येत होत्या, परंतू मी निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबातच नव्हते. मी माझ्या भावाच्या आठवणीमध्ये स्वत:लाच विसरून गेले होते.
मी हजारो लोकांच्यामध्ये असायची. परंतू मी मनामधून पुर्णपणे तुटले होते. पुढे निक्की म्हणाली वेळ पुढे जाते…पण आठवणी मागे राहतात. निक्की तंबोली ही बिग बाॅसनंतर रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी या शोमध्ये सहभागी झाली होती.