Super Dancer Chapter 4 : ‘बॅक ऑन सेट’, राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये (Super Dancer Chapter 4 ) जज म्हणून दिसली होती. शिल्पाचा पती राज कुंद्राला काही काळापूर्वी अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर शिल्पा शोमध्ये दिसली नाही.

Super Dancer Chapter 4 : ‘बॅक ऑन सेट’, राज कुंद्रा प्रकरणानंतर मोठा ब्रेक घेत शिल्पा शेट्टी कामावर परतली!
शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 2:24 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये (Super Dancer Chapter 4 ) जज म्हणून दिसली होती. शिल्पाचा पती राज कुंद्राला काही काळापूर्वी अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर शिल्पा शोमध्ये दिसली नाही. मात्र, आता तीन आठवड्याच्या गॅप ननंतर शिल्पा शोमध्ये परतत आहे.

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये शिल्पा शेट्टीच्या जागेवर कधी सोनाली बेंद्रे तर कधी जेनेलिया-रितेश दिसले होते. दर आठवड्याला काही सेलेब्स शिल्पा शेट्टीची जागा घ्यायचे. पण आता निर्मात्यांना शिल्पाची जागा घेण्यासाठी कोणाचीही गरज भासणार नाहीय. ती आता या शोमध्ये परतत आहे.

सुरु झाले चित्रिकरण

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टीने पुढच्या आठवड्याच्या भागाचे शूटिंग आजपासून सुरू केले आहे. शिल्पा पहिल्या सीझनपासून या शोचे परीक्षण करताना दिसत आहे. निर्माते शिल्पाच्या परत येण्याची वाट पाहत होते आणि आता तिच्या जागी इतर सेलेब्स घेणे टाळायचे होते. एका सूत्राने सांगितले की, आम्हाला आनंद आहे की शिल्पाने शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. आशा आहे की या सीझनच्या अखेरीपर्यंत ती हा शो जज करेल.

तो पुढे म्हणाला की, शिल्पासाठी देखील हा एक अतिशय भावनिक निर्णय होता की, ती खूप धैर्याने परत येत आहे. शिल्पा पुनरागमन करत असल्याने निर्मात्यांना खूप आनंद झाला आहे आणि आता तिची बदली शोधण्याची गरज भासणार नाही.

शिल्पा शेट्टीसह अनुराग बासू आणि गीता कपूर या शोला जज करत आहेत. हा शो अनेक आश्चर्यकारक प्रतिभावान मुलांना पुढे आणतो. या शोमध्ये 8-10 वर्षे वयोगटातील मुले आहेत, जी त्यांच्या दमदार नृत्य कौशल्याने लोकांची मने जिंकत आहेत.

या दिग्गजांनी सांभाळली परीक्षणाची धुरा!

शिल्पा शेट्टीच्या अनुपस्थितीत संगीता बिजलानी, जॅकी श्रॉफ, टेरेन्स लुईस, सोनाली बेंद्रे, मौसमी चॅटर्जी आणि करिश्मा कपूर, जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख शोचा भाग बनले होते.

‘शो मस्ट गो ऑन’

पती राज कुंद्राच्या अटकेनंतरपासून ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ ची माजी परीक्षक शिल्पा शेट्टी ही घराबाहेरच पडलेली नव्हती. तर, सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीकडून सोनी टीव्हीशी कोणताही संवाद झालेला नव्हता. म्हणूनच ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत मेकर्स पाहुणे परीक्षक आणि गीता कपूर-अनुराग बासू यांच्यासमवेत हा शो पुढे शूट करत होते.

(Actress Shilpa Shetty back on shoot of Super Dancer Chapter 4)

हेही वाचा :़

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी

बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.