Urfi Javed | या गोष्टीमुळे उर्फी जावेद दुबईमध्ये अडचणीत? वाचा नेमके काय घडले?
उर्फी अत्यंत बोल्ड लूकमध्ये कायमच दिसते. तिच्या कपड्यांमुळे तिला जीवे मारण्याची धमकी देखील मिळते.
मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये आहे. उर्फीवर तिच्या कपड्यांमुळे अनेकदा टीका केली जाते. मात्र, असे असूनही उर्फी तिची हटके स्टाईल काही सोडत नाही. विशेष म्हणजे उर्फीच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक देखील केले जाते. उर्फी अत्यंत बोल्ड लूकमध्ये कायमच दिसते. इतकेच नाहीतर उर्फी फक्त फोटोशूट वेळीच बोल्ड लूकमध्ये नसते तर कुठे स्पाॅट झाली तरीही बोल्ड लूकमध्येच दिसते. ओटीटी बिग बाॅसमधून उर्फीला खरी ओळख मिळालीये. मात्र, तिच्या कपड्यांमुळे तिला जीवे मारण्याची धमकी देखील मिळते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी ही दुबईमध्ये आहे.
आपल्या चाहत्यांसाठी उर्फी ही दुबईमधून खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. मध्यंतरी बातमी होती की, दुबईमध्ये उर्फीची तब्येत खराब झालीये. परंतू आता दुबईमध्ये उर्फी जावेद हिच्याबद्दल एक वेगळीच बातमी पुढे येतंय.
दुबईमध्ये असलेल्या उर्फी जावेद हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार दुबईमध्ये नियमांचे पालन न केल्यामुळे उर्फी जावेद ही अडचणीमध्ये सापडली आहे.
View this post on Instagram
उर्फीने स्वत: च डिझाईन केलेला एक ड्रेस घालून दुबईमध्ये व्हिडीओ तयार केला होता. यामुळेच ती अडचणीमध्ये सापडल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार तिने ज्या सार्वजनिक ठिकाणी तो व्हिडीओ तयार केला आहे, त्यामुळे ती अडचणीमध्ये सापडलीये.
ज्या ठिकाणी उर्फी जावेद हिने तो व्हिडीओ तयार केला आहे, तिथे उर्फीने ज्या प्रकारचे कपडे घातले होते. तसे कपडे घालण्यास सक्त मनाई आहे. रिपोर्टनुसार उर्फी जावेद हिची पोलिसांकडून चाैकशी केली जात आहे.
इतकेच नाहीतर पोलिसांच्या या चाैकशीमुळे उर्फीला भारतामध्ये येण्यास थोडा उशीर लागू शकतो. परंतू याबद्दल अजून उर्फी जावेद हिने चाहत्यांसोबत कोणतीच माहिती शेअर केली नाहीये.