जिसका बंदा न हो वो पंखा घुमाए, अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येचं कारण आलं समोर
तिच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीवरून तिचं कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रेम प्रकरणात अपयश आल्याने तिने आत्महत्या केली असावी असं सांगितलं जात आहे.
Vaishali Takkar Death : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रई वैशाली ठक्कर (Vaishali Takkar Death) हीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन वैशालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. बॉयफ्रेंडने धोका दिल्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतरच त्याबाबतचा खुलासा होणार आहे.
विशेष म्हणजे वैशाली ठक्कर यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचे संकेत दिले होते असं सांगितलं जात आहे. सहा दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक रील शेअर केली होती. या रीलमध्ये फक्त सिलिंग फॅन दिसत आहे. यावरून वैशालीने आत्महत्येचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे.
तिने सिलिंग फॅनचा व्हिडिओ शेअर करताना त्यावर कमेंट केली होती. जिसका बंदा/बंदी न हो, वो पंखा घुमाए, असं कॅप्शन तिने दिलं होतं. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांना हे फनी कमेंट्स वाटलं होतं. त्यामुळे त्यांनीही त्यावर मजेदार कमेंट केल्या होत्या. एका यूजर्सने तर हाय लेव्हलचा टाईमपास, अशी कमेंट केली होती.
View this post on Instagram
वैशालीने मध्यप्रदेशाची राजधानी इंदौर येथील तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई बाग कॉलोनी येथे आज आत्महत्या केली. या ठिकाणी ती राहत होती. सात वर्ष मायानगरी मुंबईत राहिल्यानंतर गेल्यावर्षी ती इंदौरमध्ये येऊन राहत होती. तिचं शिक्षणही इंदौरच्या शाळा आणि महाविद्यालयात झालं होतं.
त्यांचं कुटुंब उज्जैनच्या महिदपूरचं राहणार आहे. तिने इंदौरच्या ईएमआरसीमध्ये शिक्षण घेऊन अँकरींगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती मुंबईत आली आणि तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.
मनमोहिनी, सुपर सिस्टर्स, विष और अमृत आदी सुपरहीट मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. गेल्यावर्षी तिचा डॉ. अभिनंदन सिंह यांच्याशी साखरपुडा झाला होता. पण त्यांचं हे नातं अधिककाळ चाललं नाही. त्यामुळे त्यांनी साखरपुडा मोडला होता.
तिच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीवरून तिचं कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रेम प्रकरणात अपयश आल्याने तिने आत्महत्या केली असावी असं सांगितलं जात आहे.