Thipkyanchi Rangoli: ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्री

कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी.

Thipkyanchi Rangoli: ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्री
अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्रीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 4:31 PM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी. प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे.

स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. मात्र पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली. अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

वीणा जगताप ही ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रकाशझोतात आली. या शोमध्ये वीणा आणि शिवची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. शो संपल्यानंतर ती ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत झळकली. आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.