मुंबई : राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड (Boyfriend) आदिल दुर्रानी यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. स्वत: राखी हिने इंस्टा स्टोरीवर काही फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे हे लग्न सात महिन्यांपूर्वीच झाल्याचे राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सांगितले. राखीच्या लग्नाचे फोटो पाहून तिचे चाहते शुभेच्छा देत होते. यापूर्वी राखीचा प्रेमभंग झाला असून रितेश नात्याच्या एका व्यक्तीसोबत तिचा साखरपुडा झाला होता. यानंतर रितेशने आपल्याला धोका दिल्याचे राखी हिने सांगितले. आता राखी हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केले आहे. मात्र, हे लग्नाचे फोटो व्हायरल होताच आदिल दुर्रानी याने चक्क हे लग्न स्वीकारू शकत नसल्याचे म्हटले आहे.
आदिल दुर्रानी याने या लग्नाला स्विकारण्यास नकार दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आणि परत एकदा राखी सावंत हिला प्रेमामध्ये धोका मिळाला का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान आता आदिल दुर्रानी याने एका व्हिडीओमध्ये काही खुलासे केले आहेत.
आदिल दुर्रानी आणि राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकेच नाहीतर काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिला भेटण्यासाठी चक्क बिग बाॅस मराठीमध्ये देखील गेला होता.
आदिल दुर्रानी याने व्हिडीओमध्ये राखी सावंतसोबत केलेल्या लग्नाबाबत म्हटले आहे की, मला यावर बोलण्यासाठी फक्त १० ते १२ दिवसांचा कालावधी द्या. यावर त्याला विचारले की, तुझे आणि राखीचे खरोखर लग्न झाले आहे का? यावर तो म्हणाला, मी सर्व सांगणार आहे.
मी राखी सावंत हिच्यासोबत केलेल्या लग्नाला नकार देखील देऊन शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नसल्याचे आदिल दुर्रानी याने म्हटले आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आदिल दुर्रानी पुढे म्हणाला, कोणत्या परिस्थितीमध्ये आणि नेमक्या कोणत्या कारणामुळे हे लग्न झाले हे मी तुम्हाला सर्वांना अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. परंतू मला फक्त १० दिवसांचा कालावधी द्या. मी हे लग्न स्वीकारू शकत नसल्याचे देखील आदिल दुर्रानी याने म्हटले आहे.
म्हणजेच आता आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबत केलेल्या लग्नाबाबत मोठे खुलासे करण्याची दाट शक्यता आहे. राखी आणि आदिल दुर्रानी यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.