‘त्यांनी तर आम्हाला थेट प्रसूतिगृहातच पाठवले!’, ‘गुडन्यूज’च्या चर्चेवर आदित्य नारायणची प्रतिक्रिया
गायक आणि टीव्ही होस्ट असणाऱ्या आदित्य नारायणने (Aditya Narayan) गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले होते. दोघांचे लग्न खूप चर्चेत होते. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
मुंबई : गायक आणि टीव्ही होस्ट असणाऱ्या आदित्य नारायणने (Aditya Narayan) गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केले होते. दोघांचे लग्न खूप चर्चेत होते. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात. आता अलीकडेच आदित्यने असे विधान केले की, चाहत्यांना वाटले तो बाबा होणार आहे. पण आता या अभिनेत्याने आपले वक्तव्य स्पष्ट केले आहे.
आदित्यने नुकत्याच एक मुलाखतीत असं म्हटलं होतं की, आता त्याला कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि लवकरच आपल्या कुटुंबाला पुढे कसे न्यायचं याकडे तो लक्ष देईल. यावरून चाहत्यांना वाटलं की, त्याची पत्नी श्वेता गर्भवती आहे आणि लवकरच दोघेही पालक बनणार आहेत.
त्यानंतर आता आदित्य यावर बोलताना म्हणाला- ‘हे मुळीच खरं नाही. मी एवढेच सांगितले होते की मी इतर जोडप्यांप्रमाणे पत्नी श्वेतासमवेत आनंदाने नवीन जीवन व्यतीत करत आहे, आपल्या कुटुंबासमवेत पुढे जाण्याचा विचार आहे, आम्हीही तेच करू. मात्र, त्यानंतर हे वक्तव्य फिरवून आणि फिरवून थेट आम्हाला प्रसूतिगृहात घेऊन गेले.’
आदित्य पुढे म्हणाला की, सार्वजनिकपणे काहीही बोलण्यापूर्वी आपल्याला खूप विचार करावा लागतो कारण आपले शब्द खूपच गडबडलेले असतात.
2022 मध्ये काहीतरी मोठे करायचे आहे
वास्तविक, आदित्यने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, आता त्याला होस्टिंग सोडून काही मोठे करायचे आहे. आदित्य म्हणाला, ‘2022 हे होस्ट म्हणून माझे टीव्हीवरील शेवटचे वर्ष असेल. त्यानंतर मी होस्टिंग करणार नाही. आता काहीतरी मोठे करण्याची वेळ आली आहे. मी येत्या काही महिन्यांत माझी काही महत्त्वपूर्ण काम पूर्ण करेन.
टीव्हीमधून ब्रेक घेईन!
आदित्य म्हणाला, ‘पुढच्या वर्षी मी टीव्हीवर ब्रेक घेईन. मी एकाच वेळी बर्याच गोष्टी केल्या याचा मला आनंद झाला आहे, परंतु हा प्रवास देखील खूप दमवणारा आहे. 15 वर्षांपासून मी टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि मी याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहीन, परंतु आता पुढे गजाण्याची वेळ आली आहे. आदित्य पुढे म्हणाला की, तो टीव्ही अजिबात सोडणार असे नाही, तर तो गेम शोमध्ये भाग घेऊन किंवा परीक्षक म्हणून टीव्हीवर दिसून येईल, परंतु होस्टिंग करणार नाही.
आदित्यने 2007 मध्ये ‘सा रे गा मा पा चॅलेंज’ या शोचे आयोजन करून होस्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने ‘राइजिंग स्टार 3’, ‘एंटरटेनमेंट की रात’, ‘किचन चॅम्पियन’ आणि ‘सा रे गा मा पा’सारखे अनेक कार्यक्रम होस्ट केले आणि इंडियन आयडॉल शोच्या अनेक सीझनचे होस्टग त्याने केले. सध्या आदित्य केवळ ‘इंडियन आयडॉल 12’चे होस्ट करीत आहे.
(Aditya Narayan reaction on wife shweta’s pregnancy rumour)
हेही वाचा :
Umesh Kamat | राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा