Bigg Boss 16 | अंकित गुप्ता याला बेघर केल्याने चाहत्यांचा बिग बाॅसविरोधात रोष
आजच्या एपिसोडमध्ये अंकित बेघर होताना दिसणार आहे. अंकित बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यामुळे प्रियंका रडताना दिसत आहे.
मुंबई : बिग बाॅसचा नव्या प्रोमोनुसार अंकित गुप्ता हा घराच्याबाहेर पडला आहे. या आठवड्यासाठी अंकित गुप्ता, टीना दत्ता, श्रीजिता डे आणि विकास मानकतला नाॅमिनेट होते. बिग बाॅस घरातील सदस्यांना प्रश्न विचारतात की, या चारपैकी घरामध्ये सर्वात कमी योगदान कोणत्या सदस्याचे आहे. यावर सात जण हे अंकितचे नाव घेतात. यामुळे आता अंकित हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडला आहे. आजच्या एपिसोडमध्ये अंकित बेघर होताना दिसणार आहे. अंकित बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यामुळे प्रियंका रडताना दिसत आहे.
बिग बाॅसच्या घराबाहेर अंकित पडल्यानंतर सर्वात जास्त आनंद हा अर्चना गाैतम हिला झाल्याचे दिसत आहे. अर्चना अंकित घराच्याबाहेर पडल्यानंतर डान्स करताना दिसते. यावेळी घरातील इतर सदस्य तिला असे करू नको हे सांगताना दिसत आहेत.
Ankii -: “Wo ek mountain, ek rock ke tarha khadi hai,Pri is a very stong Contestannt and I see her as a winner of BB16” ?❤️
And Ankii We See You as a Finalist ?❤️
BB WE WANT ANKIT BACK#PriyAnkit #BiggBoss16 pic.twitter.com/zN9thBUHVp
— ???? ????????? ???????? ? (@PriyAnkitFC) December 25, 2022
बिग बाॅसच्या घरामध्ये अंकित गुप्ता काही विशेष करत नव्हता. दरवेळी प्रियंका ही अंकितला वाचवत होती. यामुळे प्रियंकाचा गेमही खराब होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा प्रियंकाचा क्लास घेताना दिसला होता.
अंकित गुप्ता घराच्याबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये एक संतापाची लाट बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहते अंकितला परत एकदा बिग बाॅसच्या घरात घेण्याची मागणी सातत्याने करताना दिसत आहेत.
The way Nim tried to take the moment from Shibdu and Abdu ignoring her and Sajid lol
WE WATCH BB16 FOR SHIV#ShivThakare #BiggBoss16
— ????????? (@PurpleKookie20) December 25, 2022
काही दिवसांपूर्वी प्रियंकाला बोलताना स्वत: च अंकित म्हणाला होता की, मी तुझ्यासाठीच बिग बाॅसमध्ये आलोय. आता मी घराच्यााबाहेर पडलो तरीही काही खास परिणाम होणार नाही. परंतू अंकितचे चाहते बिग बाॅसविरोधात पोस्ट करताना दिसत आहेत.
प्रियंका चाैधरीचे अंकित गुप्ता शिवाय घरातील कोणत्याच सदस्यासोबत जमत नाही. प्रियंका सर्वांसोबतच भांडणे करताना दिसते. सलमान खान याने देखील प्रियंका हिला विचारले होते की, अंकित शिवाय घरात तुझा मित्र कोण आहे.