सिद्धार्थच्या मृत्युनंतर शहनाज गिलची अवस्था वाईट, राहुल महाजनने सांगितली सद्य परिस्थिती
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 2 सप्टेंबर गुरुवारी सिद्धार्थचा मृत्यू झाला. अभिनेत्याचे अंतिम संस्कार आज (3 सप्टेंबर) म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहेत.
मुंबई : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 2 सप्टेंबर गुरुवारी सिद्धार्थचा मृत्यू झाला. अभिनेत्याचे अंतिम संस्कार आज (3 सप्टेंबर) म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत, सर्व सेलेब्स या कठीण काळात सिद्धार्थच्या कुटुंबाला भेटायला त्याच्या घरी गेले, ज्यात अभिनेता राहुल महाजनचाही समावेश आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर राहुल महाजन त्याच्या कुटुंबीयांना भेटले आहेत. राहुल महाजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अभिनेत्याच्या अचानक जाण्याने सिद्धार्थची आई आणि शहनाज गिल कशी अवस्था झाली आहे.
काय म्हणाला राहुल महाजन?
हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, एका मुलाखतीत राहुल यांनी म्हटले आहे की, सिद्धार्थ एक वेगळ्या प्रकारचा माणूस होता, अभिनेत्याच्या जाण्यानंतर, आज मी त्याच्या आईला भेटलो, ज्या एक अतिशय धीराच्या महिला देखील आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या धीरगंभीर होत्या आणि त्यांनी मला सांगितले की, मृत्यू स्पष्ट आहे, पण इतक्या लवकर घडू नये (तो इतक्या लवकर जाऊ नये).’ राहुलच्या मते ती एक आई आहे आणि कोणतीही आई तिच्या मुलाला तिच्या आयुष्यातून जाताना कसे पाहू शकते…
एवढेच नाही तर, राहुल महाजन यांनी सिद्धार्थ शुक्लाच्या घरी शहनाजला भेटण्याबाबतही वक्तव्य केले आहे. या अहवालानुसार, राहुलने सांगितले आहे की, शहनाज पूर्णपणे खचून गेली होती, जणू एक वादळ नुकतेच येऊन गेले आणि त्याने जीवनातील सर्व काही वाहून नेले.
‘बिग बॉस 13’च्या दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र, त्यांनी नेहमीच आम्ही फक्त जवळचे मित्र आहोत, असे म्हणत हे वृत्त टाळले. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला ‘सिडनाज’ नाव दिले होते. शोच्या आतसुद्धा, दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती.
सिद्धार्थची कारकीर्द
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
संबंधित बातम्या :