राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची साथ देतेय मौनी रॉय, फोटो शेअर करत म्हणाली…
अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) ही सध्या अतिशय कठीण काळाला सामोरी जात आहेत. काही काळापूर्वी मंदिराचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे निधन झाले. 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने राज कौशल यांचे निधन झाले होते.
मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) ही सध्या अतिशय कठीण काळाला सामोरी जात आहेत. काही काळापूर्वी मंदिराचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे निधन झाले. 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने राज कौशल यांचे निधन झाले होते. यावेळी मंदिराचा मित्रपरिवार तिच्या पाठीशी उभा आहे. ते तिचे धैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिराची खास मैत्रीण मौनी रॉयने (mouni roy) नुकतेच तिच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
मौनीने मंदिराला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. एका फोटोत मंदिराने काळ्या रंगाची लेदर पॅन्ट परिधान केलेली आहे, ज्यावर टँक टॉप परिधान केले आहे. दुसर्या फोटोत ऑफ-व्हाईट शर्टमध्ये आहे. दोन्ही फोटोंमध्ये मौनी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. फोटो शेअर करताना मौनीने लिहिले, ‘माय बेबी स्ट्राँगेस्ट’.
पाहा पोस्ट :
View this post on Instagram
अनेक सेलिब्रिटींनी मौनीच्या पोस्टवर भाष्य केले आहे. अभिनेत्री आशका गरोडियाने हार्ट इमोजी पोस्ट केले. बरेच चाहतेही मौनीच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘तिला बरीच शक्ती मिळावी’. एका चाहत्याने लिहिले, ‘बेस्टी.’
आईबरोबर फिरण्यासाठी बाहेर पडली मंदिरा
नवरा राज यांच्या निधनानंतर आता मंदिरा स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. रविवारी ती आईसमवेत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. फिरायला जाताना ती आईशी गप्पा मारत होती. मंदिराला दोन मुलेही आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी तिला स्वत:ला मजबूत बनवावं लागेल आणि तीही ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
शेअर केले पतीसोबतचे फोटो
पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदी यांनी त्यांच्याबरोबर बरीच छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. ज्यामध्ये दोघे हसत हसत आयुष्य जगताना दिसत आहेत. तिने फोटोसह हार्ट ब्रेकिंग इमोजी पोस्ट केले.
मंदिरा बेदी झाली ट्रोल
पतीच्या निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कारात सामील झालेल्या मंदिरा बेदीला कपड्यांवरून ट्रोल केले गेले होते. मंदिराने जीन्स-टी-शर्ट परिधान करून तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. यानंतर लोक तिच्यावर टिप्पण्या करत होते. त्या काळात बरेच सेलेब्रेटी मंदिराच्या समर्थनार्थ पुढे आले होते आणि त्यांनी या गोष्टींची निंदा केली होती. पतीचे अंत्यसंस्कार केल्याबद्दल मंदिराचेही खूप कौतुक झाले होते.
(After the death of Raj Kaushal Mouni Roy is supporting Mandira Bedi)
हेही वाचा :
‘उफ्फ ये खूबसूरती’, गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये ‘नागिन’ फेम सुरभी चंदनाचे ग्लॅमरस फोटोशूट!
‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!