तुनिशा शर्मा हिला पैशांची चणचण? या मैत्रिणीकडून घेतले होते उधार पैसे

शीजान खान याच्या बहिणींनी तुनिशाच्या आईवर अनेक आरोप केले.

तुनिशा शर्मा हिला पैशांची चणचण? या मैत्रिणीकडून घेतले होते उधार पैसे
तुनिषा शर्माImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 5:28 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. शीजान हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पोलिसांनी शीजान खान याचा फोनही जप्त केला आहे. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांनंतर शीजान खान याच्या कुटुंबियांनी देखील तुनिशा शर्मा हिच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. 23 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत तुनिशाने आत्महत्या केली.

शीजान खान याच्या बहिणींनी सांगितले होते की, तुनिशाला तिची आई कंट्रोल करत होती. इतकेच नाहीतर तिचे आणि तिच्या आईचे संबंध अजिबात चांगले नव्हते. शीजान खान याच्या बहिणींनी तुनिशाच्या आईवर अनेक आरोप केले.

आता तुनिशा हिच्या मैत्रिणीने तुनिशाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सोनिया सिंह हिने म्हटले आहे की, तुनिशाकडे कायमच पैशांची चणचण असायची, तिच्याकडे पैसे नसायचे.

गेल्या महिन्यात तुनिशाने माझ्याकडून 3 हजार मागितले होते. मी तिला विचारले की, काय झाले…यावर तुनिशा म्हणाली होती की, माझ्याकडे पैसे नाहीयेत. सोनिया म्हणाली, तुनिशाला जेंव्हा केंव्हा वेळ मिळायचा त्यावेळी ती मला फोन कायमच करायची.

14 डिसेंबरला देखील तुनिशा हिने सोनियाला तिच्या आणि शीजान खान याच्या रिलेशनमध्ये काय सुरू आहे याची माहिती दिली होती. शीजानला काही दिवस स्पेस पाहिजे असल्याचे तुनिशाने सोनियाला सांगितले होते.

सोनियाने पुढे म्हटले की, 23 डिसेंबरला मला तुनिशाचा फोन आला होता. यावेळी तुनिशाने मला म्हटले होते की, माझ्या आईचा तुला फोन आला तर सांग मी तुझ्यासोबत आहे. यावेळी मला काहीच समजले नव्हते की, तुनिशाने तिच्या आईला खोटे बोलण्यास मला का सांगितले होते.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....