अली बाबा: दास्तान ए काबुल मालिका पुन्हा एकदा ऑन एअर, तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 03, 2023 | 9:06 PM

30 डिसेंबरपर्यंत शीजान खान हा पोलिस कोठडीमध्ये होता आणि आता तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

अली बाबा: दास्तान ए काबुल मालिका पुन्हा एकदा ऑन एअर, तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Follow us on

मुंबई : अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर गळफास घेत तुनिशा शर्मा हिने आपली जीवनयात्रा संपवली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप झाले. तुनिशा आत्महत्या प्रकरणात अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबत मुख्य भूमिकेत असलेला शीजान खान हा कोठडीमध्ये आहे. 24 डिसेंबरला तुनिशाने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी शीजान खान याला अटक केलीये. 30 डिसेंबरपर्यंत शीजान खान हा पोलिस कोठडीमध्ये होता आणि आता तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. तुनिशाच्या आईनंतर शीजान खान याच्या कुटुंबियांनी देखील तुनिशाच्या आईवर अनेक आरोप केले आहेत.

तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशाने आत्महत्या केली असून माझ्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच जबाबदार असल्याचे तुनिशाच्या आईने म्हटले आहे.

अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही मुख्य भूमिकेमध्ये होते. आता तुनिशाने कायमसाठी जगाचा निरोप घेतलाय आणि शीजान खान हा कोठडीमध्ये आहे.

अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेची शुटिंग याप्रकरणानंतर बंद करण्यात आली होती. मात्र, शोचे काही भाग अगोदरच तयार असल्यामुळे शो आॅन एअर सुरू होता. आता यापुढे शीजान खान हा मालिकेमध्ये दिसणार नसल्याची चर्चा आहे.

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणानंतर परत एकदा अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आलीये. मात्र, तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्याने सेटवर भीतीचे वातावरण असल्याने निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अली बाबा: दास्तान ए काबुलचा सेट आता इतरत्र हलवण्यात आलाय. कारण तुनिशाने त्या सेटवर आत्महत्या केल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण होते. बऱ्याच लोकांना वाटले होते की, तुनिशाच्या आत्महत्येनंतर शो काही दिवस बंद होईल, परंतू तसे झाले नाहीये.