Swarajya Rakshak Sambhaji: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा; धगधगता इतिहास आता चित्रपटरुपात

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajya Rakshak Sambhaji) या लोकप्रिय मालिकेने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं.

Swarajya Rakshak Sambhaji: 'स्वराज्यरक्षक संभाजी' पुन्हा एकदा; धगधगता इतिहास आता चित्रपटरुपात
Swarajya Rakshak Sambhaji Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 7:45 AM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajya Rakshak Sambhaji) या लोकप्रिय मालिकेने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली. संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेतील प्रत्येक पात्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालं. प्रेक्षक अजूनही या मालिकेला पाहण्याचा मोह आवरु शकत नाही. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखरबर आहे.

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे पासून मे महिन्यातील प्रत्येक रविवारी छत्रपती संभाजी मालिका चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या मालिकेतील प्रमुख घटना चित्रपट स्वरूपात प्रत्येक रविवारी प्रेक्षकांसाठी सादर केल्या जातील. येत्या रविवारी दुपारी 12 वाजता प्रेक्षकांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजी राजांनी घडवलेला इतिहास पाहायला मिळेल.

लॉकडाउनच्या काळातही ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिकांसोबतच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यात आली होती. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका होती.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.