Anees Bazmee | अखेर हेरा फेरी 3 चित्रपटाच्या वादावर अनीस बज्मीने सोडले माैन
अक्षय याने बिनधास्त सांगितले की, मला इच्छा नसताना देखील हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार द्यावा लागला.

मुंबई : हेरा फेरी 3 हा चित्रपट शूटिंग सुरू होण्याच्या अगोदरपासूनच प्रचंड चर्चेत आलाय. हेरा फेरी या चित्रपटांनी यापूर्वी बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. आता लवकरच हेरा फेरी 3 हा चित्रपट देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतू अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली. अक्षय याने बिनधास्त सांगितले की, मला इच्छा नसताना देखील हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार द्यावा लागला. कारण मला चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबातच आवडलीये नाहीये. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले.
अक्षय कुमार याच्या या विधानाची चर्चा सुरू असतानाच यावर चित्रपटाचे प्रॉड्यूसर फिरोज नाडियाडवालाने नाराजी जाहिर केली. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, अक्षय कुमारची जागा या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन हा घेणार आहे.
फिरोज नाडियाडवाला आणि अक्षय कुमारच्या हेरा फेरी 3 साठी मिटिंग सुरू असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, अजून हे स्पष्ट होऊ शकत नाही की, हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार की कार्तिक आर्यन दिसणार आहे.
हेरा फेरी 3 च्या गोंधळामध्ये आता अनीस बज्मीने मोठे विधान केले आहे. अनीस बज्मी म्हटले आहे की, मी अजून चित्रपट साइन केलेला नाही. जोपर्यंत मी हो म्हणत नाही तोपर्यंत कार्तिक आर्यन इन आणि अक्षय कुमार इन आउट चालूच राहणार आहे.
कार्तिक आर्यन याच्या व्यवहारामुळे हेरा फेरी 3 चे प्रॉड्यूसर नाराज होते आणि यामुळे कार्तिक चित्रपटामध्ये दिसणार नसून आता परत अक्षय कुमारच चित्रपटामध्ये दिसेल अशीही चर्चा सुरू होती.
यावर कार्तिक आर्यनच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, कार्तिक आर्यन याच्याजवळ चित्रपटाची स्क्रीप्ट देखील आली नाहीये. या फक्त अफवा असल्याचे सांगण्यात आले. अजूनही हे स्पष्ट होऊ शकले नाहीये की, हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन की अक्षय कुमार दिसणार आहे.