Anita Date: अखेर ‘त्या’ फोटोमागचं कोडं उलगडलं; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतून अनिता दातेचं पुनरागमन

या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एण्ट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे.

Anita Date: अखेर 'त्या' फोटोमागचं कोडं उलगडलं; 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून अनिता दातेचं पुनरागमन
Anita DateImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 3:02 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) हिच्या फोटो फ्रेमला हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोसोबत ‘जो आवडतो सर्वांना..’ असं कॅप्शनदेखील देण्यात आलं होतं. या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय? हा फोटो शेअर करण्यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे. नुकताच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सादर करण्यात आला आहे. नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एण्ट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही माध्यमात पदार्पण करतेय. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेनंतर दोन वर्षांनी प्रेक्षकांना त्यांची आवडती अभिनेत्री अनिता दाते हिला पुन्हा एकदा ‘नवा गाडी नवं राज्य’ या मालिकेतून एका नवीन भूमिकेत पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनिता म्हणाली, “माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिकानंतर आता रमा या नवीन भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय याचा मला अतिशय आनंद आहे. रमा हे पात्र मालिकेत हयात नाही आहे पण तरी देखील या पात्रामुळे मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. त्यामुळे ही रमा साकारताना मला खूप मजा येतेय. प्रेक्षकांना राधिकासारखीच रमादेखील खूप आवडेल अशी मला खात्री आहे.” ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका 8 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.