Ankit Gupta | अंकित गुप्ता याने उडवली बिग बाॅस विजेता एमसी स्टॅन याची खिल्ली, म्हणाला याचे काहीच योगदान…

टाॅप 5 मध्ये प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालिन भनोट आणि अर्चना गाैतम पोहचले होते. मात्र, सोशल मीडियावर प्रियंकाचे चाहते तिला जास्त प्रमाणात सपोर्ट करताना दिसत होते.

Ankit Gupta | अंकित गुप्ता याने उडवली बिग बाॅस विजेता एमसी स्टॅन याची खिल्ली, म्हणाला याचे काहीच योगदान...
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 4:04 PM

मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले काल पार पडलाय. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) ची ट्रॉफी आता एमसी स्टॅन याच्याकडे आहे. सर्वांना शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण हा बिग बाॅस 16 चा विजेता ठरेल असे वाटत होते. परंतू बिग बाॅस 16 चा निकाल धक्कादायक अनेकांसाठी ठरला आहे. मुळात म्हणजे एमसी स्टॅन (MC Stan) जरी घरामध्ये जास्त टास्क वगैरे खेळत नसला तरीही बाहेर त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. टाॅप 5 मध्ये प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालिन भनोट आणि अर्चना गाैतम पोहचले होते. मात्र, सोशल मीडियावर प्रियंकाचे चाहते तिला जास्त प्रमाणात सपोर्ट करताना दिसत होते. खरी स्पर्धा सुरूवातीपासूनच प्रियंका चाैधरी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये बघायला मिळत होती. अर्चना गाैतम ही बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर प्रियंका पडेल याचा अंदाजा मात्र, कोणालीही नव्हता. एमसी स्टॅन हा विजेता झालाय तर दुसऱ्या क्रमांकावर शिव ठाकरे (Shiv Thakare) आहे. अर्चना गाैतम बाहेर गेल्यानंतर सलमान खान याने प्रियंका चाैधरी हिला सांगितले की, प्रियंका हिला कमी वोट मिळाले असून बिग बाॅस 16 च्या विजेतेपदाच्या रेसमधून तू बाहेर पडलीये.

सलमान खान याने प्रियंका चाैधरीला कमी वोट पडल्याचे सांगताच अंकित शांत झाला आणि हे होऊच शकत नाही म्हणताना दिसला. मात्र, प्रत्यक्षात प्रियंका ही बिग बाॅसच्या बाहेर आल्यानंतर अंकित रडताना दिसला.

दुसरीकडे साजिद खान आणि अब्दु रोजिक उड्या मारून आनंद व्यक्त करत होते. एमसी स्टॅन हा विजेता झाल्यानंतर अंकित गुप्ता याचा पारा चढल्याचे दिसले. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात शांत राहणारा अंकित रागात होता.

एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर अनेक प्रश्न अंकित गुप्ता याने उपस्थित केले. अंकित गुप्ता म्हणाला की, गेममध्ये कधीच बिग बाॅसच्या घरात स्टॅन दिसला नाही. त्याने शोसाठी फार कमी योगदान दिले आहे.

पुढे अंकित हसत हसत म्हणाला की, एमसी स्टॅन याच्यापेक्षा मी खूप चांगला होतो. यार मी आता यावर काय बोलू…मला वाटते की, बिग बाॅस 16 ची खरी विजेती ही प्रियंका चाैधरी हिच आहे. आता अंकित गुप्ता याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.