Ankita Lokhande: “विकीच्या जागी दुसरा कोणी असता तर..”, सुशांतच्या मृत्यूनंतरच्या काळाविषयी अंकिता झाली व्यक्त
अंकिता आणि सुशांतचं 2016 मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 पासून ती विकीला डेट करू लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांनी ‘स्मार्ट जोडी’ या रिॲलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. या शोमध्ये अंकिता-विकी त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाले. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर आमच्या नात्यासमोर मोठं आव्हान उभं राहिल्याचं विकीने यावेळी सांगितलं. त्यावेळी एकीकडे अंकिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता, तर दुसरीकडे अंकिता आणि समोर असलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याबद्दल विकीसमोर बरेच प्रश्न होते. अंकिता आणि सुशांतचं 2016 मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 पासून ती विकीला डेट करू लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “सुशांतच्या निधनानंतर लोकांनी मला प्रचंड ट्रोल केलं. सुशांतसाठी अंकिता बेस्ट होती, तिने त्याच्यासोबत राहायला पाहिजे होतं, असं अनेकजण म्हणत होते. अनेकांनी विकीवर टीका केली आणि मला सोडून जाण्याचा सल्ला त्याला दिला. आपल्या होणाऱ्या पत्नीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल टेलिव्हिजनवर व्यक्त होणं कोणालाच आवडलं नसतं. कोणत्याही व्यक्तीसाठी हे पाहणं सोपं नसतं. त्यावेळी दररोज सुशांतविषयी काहीतरी नवी माहिती समोर यायची आणि मी सतत त्याच्याविषयी बोलत होती. विकीच्या जागी जर दुसरा कोणता पुरुष असता तर त्याने मला कधीच सोडलं असतं. पण त्याने माझी खूप साथ दिली. सुशांतसाठी जे चांगलं आहे ते तू कर, असं तो मला म्हणाला. विकीच्या कुटुंबीयांनीही माझी साथ दिली.”
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
स्मार्ट जोडी हा शो स्टार प्लस वाहिनीवर फेब्रुवारीपासून सुरू झाला. अंकिता आणि विकीने डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर लगेचच या शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये टेलिव्हिजनवरील इतरही लोकप्रिय दाम्पत्यांनी भाग घेतला होता. त्यात अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, भाग्यश्री-हिमालय दासानी, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, नताल्या इलिना- राहुल महाजन, पल्लवी शुक्ला-अंकित तिवारी, मोनालिसा-विक्रांत सिंग यांचाही त्यात समावेश होता.