Anu Malik | मी या व्यक्तींमुळेच जिवंत म्हणत, अनु मलिक यांनी केले मोठे विधान

| Updated on: Jan 15, 2023 | 10:56 PM

सा रे ग म प शोमध्ये येणारा एपिसोड हा फॅमिली स्पेशल आहे. यामध्ये अनु मलिक हे भावूक झाल्याचे दिसत आहे.

Anu Malik | मी या व्यक्तींमुळेच जिवंत म्हणत, अनु मलिक यांनी केले मोठे विधान
Follow us on

मुंबई : सा रे ग म प…या शोमध्ये संगीतकार अनु मलिक (Anu Malik) हे जज आहेत. भारती सिंह शोला होस्ट करत आहे. भारतीचे विनोद ऐकून सर्वचजण पोट धरून हासायला लागतात. सा रे ग म प शोचा येणार एपिसोड अत्यंत खास ठरणार आहे. अनु मलिक भावूक झाल्याचे या एपिसोडमध्ये (Episode) बघायला मिळणार आहे. इतकेच नाहीतर या तीन व्यक्तींमुळेच मी जिवंत असल्याचे देखील अनु मलिक सांगताना दिसत आहे. या तीन व्यक्ती माझी ताकद असल्याचे देखील अनु मलिक यांनी म्हटले आहे. शंकर महादेवन, नीति मोहन आणि अनु मलिक हे शो जज करत आहेत. सा रे ग म प च्या माध्यमातून लहान मुलांनी त्यांच्या गोड आवाजाने प्रेक्षकांना (Audience) मंत्रमुग्ध केले आहे.

सा रे ग म प शोमध्ये येणारा एपिसोड हा फॅमिली स्पेशल आहे. यामध्ये अनु मलिक हे भावूक झाल्याचे दिसत आहे. यामध्ये अनु मलिक याच्यासाठी त्यांच्या फॅमिलीचा एक खास मेसेज हा दाखवण्यात येणार आहे.

या मेसेजमध्ये अनु मलिक हे किती स्ट्रॉन्ग आहेत, हे सांगितले जात आहे. आयुष्यामध्ये आलेल्या अडचणीमध्ये त्यांनी कधीच हार मानली नसल्याचे या मेसेजमध्ये सांगितले आहे. हाच मेसेज ऐकल्यानंतर ते भावूक झाल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे या मेसेजसाठी अनु मलिक हे टीमला धन्यवाद देताना देखील दिसत आहेत. यावेळी अनु मलिक म्हणाले की, मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग बघितले आहेत. मात्र, आज मी ज्याठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या पत्नी आणि मुलींमुळेच…

पुढे अनु मलिक म्हणाले, असे म्हटले जाते की फॅमिलीचा आधारस्तंभ कायम मोठा माणूस असतो. परंतू माझ्या फॅमिलीचा आधारस्तंभ, माझी शक्ती, माझी ताकद माझी पत्नी आणि माझ्या दोन मुली आहेत.

मी आज फक्त माझ्या पत्नीमुळे आणि माझ्या दोन मुलींमुळेच जिवंत आहे. अनु मलिक पुढे म्हणाले, जर आपली फॅमिली आपल्यासोबत असेल तर आपण काहीही करून शकतो. अनु मलिक यांच्या पत्नीचे नाव अंजली वासुदेव भट्ट असे आहे.