अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या भांडणावर अर्चना गाैतम हिने केले मोठे विधान, म्हणाली…
गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस 16 तील स्पर्धेक प्रचंड चर्चेत आहेत. आता बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन बरेच दिवस उलटले असतानाही बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक पार्टी करत धमाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याच्या पार्टीतील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.
मुंबई : बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चे स्पर्धेक चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, मंडली तुटली आहे. अब्दू रोजिक याने बोलताना मंडली तुटल्याचे म्हटले होते. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. नुकताच अब्दू रोजिक (MC Stan) याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. यामुळे चाहते हैराण झाले. बिग बॉस 16 मध्ये अब्दू रोजिक, एमसी स्टॅन, शिव ठाकरे, साजिद खान, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली. या मैत्रीचे नाव अर्चना गाैतम (Archana Gautam) हिने मंडली असे ठेवले.
बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा झाला. एमसी स्टॅन हा विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण अनेकांना वाटत होते की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बॉस 16 चा विजेता होईल. मात्र, जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला.
एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या भांडणावर आता अर्चना गाैतम हिने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अर्चना गाैतम म्हणाली की, दुधात लिंबू टाकल्यावर दही बनते…यांच्यापेक्षा आमची मैत्री चांगली…जशी होती तशीच राहिली आहे आणि पुढे भविष्यातही तशी टिकेल…मला वाटत होते की, बिग बाॅसच्या घरात सर्वात जास्त फायदा हा अब्दू रोजिक याचा घेतला जातो.
अब्दू रोजिक याला हे कळते की, नाही हेच मला अगोदर कळत नव्हते. परंतू मला असे वाटते, या दोघांनी एकत्र बसून बोलून यांच्यामधील जो वाद आहे तो दूर करावा आणि पुढे देखील आपली मैत्री ही कायम ठेवावी. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर नुकताच शिव ठाकरे यानेही प्रतिक्रिया दिली आहे.
शिव ठाकरे म्हणाला होता की, मित्रांमध्ये बऱ्याच वेळा भांडणे होतात…म्हणजे असे होत नाही की त्यांची मैत्री संपली…अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने मुंबईमध्ये बिग बाॅसच्या घरातील सदस्यांसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतीला अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पार्टीत सर्वजण धमाल करताना दिसले.