Bigg Boss 16 | खरोखरच ‘अर्चना गाैतम’ने केलेल्या आरोपांमध्ये सत्यता आहे?
शिव हा एमसी स्टॅन आणि सुंबुलला पाण्यात जाण्याचे सांगता आणि अब्दूला घराचा कॅप्टन बनवतो.
मुंबई : बिग बाॅसच्या घराची सूत्रे आता अब्दूच्या हातामध्ये आहेत. शेवटी शिव ठाकरेला निर्णय घ्यायचा असतो की, सुंबुल ताैकीर, अब्दू आणि एमसी स्टॅनमधून बिग बाॅसच्या घराचा नवा कॅप्टन कोणाला बनवायचे हे. शिव हा एमसी स्टॅन आणि सुंबुलला पाण्यात जाण्याचे सांगत. अब्दूला घराचा कॅप्टन बनवतो. घरातील जवळपास सर्वच सदस्यांना अब्दू घराचा कॅप्टन झाल्याने आनंद होतो. विशेष म्हणजे कोणाचीही मदत न घेतला पहिल्याच दिवशी अब्दू घरातील सर्व सदस्यांना कोणी कोणते काम करायचे हे सांगतो.
निम्रत काैर, शिव ठाकरे आणि गाैतमनंतर अब्दू घराचा कॅप्टन झाला आहे. बिग बाॅसच्या घराच्या कॅप्टनकडे अनेक अधिकार असतात, शिवाय कॅप्टन नाॅमिनेशनपासून देखील वाचतो. आता अब्दूच्या कॅप्टनशीमध्ये घरामध्ये काय धमाके होतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Shiv-Priyanka hilarious fight ? . . .#PriyankaChaharChoudhary #ShivThakare #AnkitGupta #BiggBoss16 #BB16#UnseenUndekhapic.twitter.com/OpjIhHkmGR
— ??????? (@bb16_lf_updates) November 5, 2022
नेहमीप्रमाणे बिग बाॅसच्या घरात अर्चना गोंधळ घालताना दिसते. बॅग सापडत नसल्याने अर्चना अनेक आरोप करते. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या निर्मात्यांनाही अनेक गोष्टी सुनावते. बॅग सापडत नसल्याने अर्चना विकेंड का वारमध्ये विचित्र मेकअप करून बसते.
अर्चना बिग बाॅसवर भेदभाव करत असल्याचा आरोपही करते. यानंतर सलमान खान अर्चनाचा चांगलाच क्लास लावतो. बॅग सापडत नसल्याने अर्चना बिग बाॅसच्या निर्मात्यांवर आरोप करते. मात्र, आता अर्चनाने केलेल्या आरोपांची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे आणि खरोखरच बिग बाॅस भेदभाव करतात का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.