Bigg Boss 16 | अर्चना गाैतम हिच्या भावाचा अंदाज पाहून घरातील सदस्य हैराण
अब्दु रोजिक तर गुलशन याला पाहून दूर पळून जाताना दिसतोय. अर्चना गाैतम हिच्यापेक्षा तिचा भाऊ घरामध्ये हंगामा करताना दिसत आहे.
मुंबई : बिग बाॅसच्या घरात आता फक्त बिग बाॅसमधील स्पर्धेकच नाही तर त्यांचे फॅमिली मेंबर येऊन धमाका करताना दिसत आहेत. अर्चना गाैतम हिचा भाऊ गुलशन हा घरामध्ये येणार असून त्याने घरात जोरदार हंगामा करण्यास सुरूवात केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. अब्दु रोजिक तर गुलशन याला पाहून दूर पळून जाताना दिसतोय. अर्चना गाैतम हिच्यापेक्षा तिचा भाऊ घरामध्ये हंगामा करताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात दाखल होताच अर्चनाचा भाऊ गुलशन म्हणाला, माझी हरवलेली बहीण कुठे आहे?
अर्चनाच्या जवळ जाऊन गुलशन सर्वात अगोदर तिला भेटतो आणि नंतर घरातील सर्व सदस्यांना भेटतो. अब्दु रोजिक याला गुलशन अशाप्रकारे उचलून फिरवतो की, अब्दु तिथून पळून जातो.
View this post on Instagram
अर्चनाच्या भावाचा हा अंदाज पाहून घरातील सर्वच सदस्य हैराण होतात. अर्चना हिच्यापेक्षा भाऊ खतरनाक असल्याचे घरातील सर्वच सदस्य म्हणताना दिसत आहेत. तो सर्वांनाच हसवत देखील आहे.
बिग बाॅसच्या घरात सध्या शिव ठाकरेची आई, साजिद खान याची बहीण फराह खान आणि प्रियंकाचा भाऊ घरात आले आहेत. व्हायरल झालेल्या प्रोमोनुसार बिग बाॅसच्या घरात आज परत तीन फॅमिली मेंबर सहभागी होणार आहेत.
View this post on Instagram
अर्चना गाैतमचा भाऊ गुलशन, एमसी स्टॅनची आई, निम्रत काैरचे वडील हे बिग बाॅसमध्ये येणार आहेत. निम्रतचे वडील तिला एकटी होऊन गेम खेळण्याचा सल्ला देताना प्रोमोमध्ये दिसत आहेत.