मुंबई : बिग बाॅस फेम अर्चना गाैतम हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख मिळवलीये. बिग बाॅसमध्ये (Archana Gautam) एका वेगळ्याच अंदाजामध्ये अर्चना गाैतम ही दिसली होती. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यापासून अर्चना गाैतम ही सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावरही अर्चना ही चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वी फराह खान (Farah Khan) हिने दिलेल्या पार्टीमध्ये अर्चना गाैतम ही धमाल करताना दिसली होती. या पार्टीमध्ये मंडलीसोबत डान्स करतानाही अर्चना दिसली. अर्चना गाैतम, प्रियांका चाैधरी, साैंदर्या शर्मा यांचा एक ग्रुप बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात बघायला मिळाला होता.
बिग बाॅसच्या घरात असताना एका भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. यावेळी शिव ठाकरे याच्या गळ्याला मोठी दुखापत देखील झाली होती. बिग बाॅसने यानंतर अर्चना गाैतम हिला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, सलमान खान याच्या आर्शिवादाने परत एकदा बिग बाॅसच्या घरात येण्याची संधी ही अर्चना गाैतम हिला मिळाली होती.
नुकताच अर्चना गाैतम ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. अर्चना गाैतम हिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अर्चना गाैतम ही या व्हिडीओमध्ये अनेक पोज देताना दिसत आहे. एका मॅगजीनसाठी अर्चना गाैतम हे फोटोशूट करत आहे. अर्चना गाैतम हिचा बोल्ड लूकमधील व्हिडीओ पाहून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. केशरी आणि गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये हे फोटोशूट करताना अर्चना गाैतम ही दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीमध्ये अर्चना गाैतम ही पोहचली होती. अर्चना गाैतम हिच्यासोबत तिचा भाऊ देखील होता. मात्र, यावेळी अर्चना गाैतम हिच्या भावाला पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी आयडी कार्ड विचारण्यात आले. यावेळी आपण अर्चना गाैतम हिच्यासोबत असल्याचे सांगताना तिचा भाऊ दिसला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे पार्टीत जाता येणार नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी यावेळी सांगितले. त्यानंतर अर्चना गाैतम हिने त्यांना विनंती केली. परंतू त्याला पार्टीत सोडले गेले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला होता. बिग बाॅस 16 च्या घरातील वादग्रस्त नाव अर्चना गाैतम हे होते. कारण नसतानाही बऱ्याच वेळा अर्चना गाैतम ही भांडताना दिसली होती.