Aai Kuthe Kay Karte: ‘पाकीटमार’ पत्रकारांमुळे जोगळेकर-केळकरांच्या कार्यक्रमात तमाशा, संजना देशमुखवर डाव कसा उलटला?

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधतीने (Arundhati) आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. अरुंधतीचं 'सुखाचे चांदणे' हा म्युझिक अल्बम लाँच सोहळा मालिकेत नुकताच पार पडला. मात्र अनिरुद्ध आणि संजनासारखे (Sanjana) लोक तिच्या आयुष्यात असताना हा सोहळा निर्विघ्नपणे कसा पार पडू शकेल?

Aai Kuthe Kay Karte: 'पाकीटमार' पत्रकारांमुळे जोगळेकर-केळकरांच्या कार्यक्रमात तमाशा, संजना देशमुखवर डाव कसा उलटला?
Aai Kuthe Kay Karte updatesImage Credit source: Hotstar
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:08 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधतीने (Arundhati) आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ हा म्युझिक अल्बम लाँच सोहळा मालिकेत नुकताच पार पडला. मात्र अनिरुद्ध आणि संजनासारखे (Sanjana) लोक तिच्या आयुष्यात असताना हा सोहळा निर्विघ्नपणे कसा पार पडू शकेल? एका बाईचं यश हे दुसऱ्या बाईला पाहिलं जात नाही, असं म्हणतात. हेच संजनाच्या बाबतीत घडतंय. अरुंधतीची लायकी नसताना तिला सगळं मिळतंय, असं तिला वाटतंय. हीच तिची ईर्षा तिला शांत बसू देत नाहीये. अरुंधतीवरील द्वेषापोटी तिने या म्युझिक लाँच सोहळ्यालाही गालबोट लावलंय. मात्र अरुंधतीही आता पहिल्यासारखी लाजरी-बुजरी आणि लगेच घाबरणारी नाही, हे ती विसरली आहे.

आशुतोषच्या कंपनीत संजना ही मीडिया आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतेय. अरुंधतीचा अपमान करायची एकही संधी ती सोडत नाही. मग म्युझिक लाँचसारख्या मोठ्या कार्यक्रमाची संधी ती हातातून कशी निसटू देणार? या कार्यक्रमात ती पैसे देऊन काही पत्रकारांना बोलावते आणि त्यांना अरुंधतीच्या खासगी आयुष्यावर प्रश्न विचारायला लावते. अरुंधतीने तिच्या व्यावसायिक आयुष्यात कितीही यश संपादित केलं तरी तिच्या खासगी आयुष्यावरील डाग कधीच पुसले जाणार नाहीत, याची जाणीव संजना तिला वारंवार करून देतेय. मात्र यावेळी न डगमगता अरुंधतीही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देते.

मालिकेचा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संजना यावेळी अरुंधतीसोबत थेट पंगा घेतला असला तरी अरुंधती आता एकटी नाही. तिच्यासोबत तिची मुलं, मित्र, आई, भाऊ, अविनाश आणि अप्पा असे सगळेच आहेत. संजनाने केलेल्या या कृत्यानंतर तिच्यावरच तिचा डाव उलटतो. अरुंधती संजनाला कामावरून काढून टाकते. ‘आशुतोष केळकरच्या जीवावर एवढी उडतेयस का तू?,’ अशी टीका करणाऱ्या संजनाला अरुंधती सडेतोड उत्तर देते. “मला कोणाच्याही आधाराची गरज नाही, तुला आहे. म्हणून तू अशी वागतेयस. तू अशी का झालीस याचा विचार कर,” असं अरुंधती संजनाला म्हणते. “तुझी लायकी नसतानाही तुला सगळं मिळतंय. तू खूप पुढे निघून गेलीस आणि मी तिथेच अडकली. मला तुझा हा आनंद नाही बघवत,” असं संजना स्पष्टपणे सर्वांसमोर बोलते. यावेळी आशुतोषही शांत बसत नाही. संजना आणि अनिरुद्धला तो तिथून निघून जाण्यास सांगतो. घडलेल्या घटनेनंतर सर्वजण अरुंधतीला समजावून सांगतात आणि तिची साथ देतात. यानंतर आता मालिकेत कोणता ट्विस्ट येईल, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा:

Video: आलिशान गाडी सोडून नवाजुद्दीनने मुंबई लोकल ट्रेनने केला प्रवास; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Video: “त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.