Arvind Trivedi Died : लाडक्या ‘रावणा’ला निरोप देताना कलाकारही झाले भावूक, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली!
भिनय आणि राजकारणात हात आजमावणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांच्या निधनामुळे टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ‘रामायण’मध्ये ‘रावणा’ची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय झालेले अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे सह-कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांच्यासह ते चित्रपट आणि टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई : अभिनय आणि राजकारणात हात आजमावणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांच्या निधनामुळे टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ‘रामायण’मध्ये ‘रावणा’ची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय झालेले अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे सह-कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांच्यासह ते चित्रपट आणि टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
अरविंद त्रिवेदींसोबत स्वतःचा एक चित्र शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की, ‘आपण श्री अरविंद त्रिवेदी यांना गमावले, जे केवळ एक विलक्षण अभिनेतेच नव्हते, तर लोकसेवेबद्दल देखील उत्कट होते. भारताच्या पिढ्यान् पिढ्या, रामायण टीव्ही सीरियलमधील त्यांच्या कामासाठी त्यांची आठवण राहील… ‘ अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच, पीएम मोदींनी कर्करोगाने मरण पावलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे नट्टू काका उर्फ अभिनेते घनश्याम नायक यांनाही श्रद्धांजली वाहिली. घनश्याम नायक यांचे सोमवारी निधन झाले होते.
पाहा पोस्ट :
We have lost Shri Arvind Trivedi, who was not only an exceptional actor but also was passionate about public service. For generations of Indians, he will be remembered for his work in the Ramayan TV serial. Condolences to the families and admirers of both actors. Om Shanti. pic.twitter.com/cB7VaXuKOJ
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2021
अरविंद त्रिवेदींचे सहकलाकारही भावूक
रामायणातील ‘रामा’ची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेल्या अरुण गोविल यांनी आपल्या प्रिय सहकलाकार अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘आध्यात्मिकरित्या रामावतारचे कारण आणि एक अतिशय थोर, धार्मिक, साध्या स्वभावाची व्यक्ती आणि माझे प्रिय मित्र अरविंद त्रिवेदी यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना भगवान श्री रामाचा सहवास मिळेल.’
आध्यात्मिक रूप से रामावतार का कारण और सांसारिक रूप से एक बहुत ही नेक,धार्मिक, सरल स्वभावी इंसान और मेरे अतिप्रिय मित्र अरविंद त्रिवेदी जी को आज मानव समाज ने खो दिया। नि:संदेह वे सीधे परमधाम जाएंगे और भगवान श्रीराम का सानिध्य पाएंगे।??
— Arun Govil (@arungovil12) October 6, 2021
या पौराणिक शोमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि लिहिले की, ‘आमचे लाडके अरविंद भाई आता आमच्यासोबत राहिले नाहीत, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. माझ्याकडे शब्द नाहीत. मी एक वडील, सज्जन, मार्गदर्शक आणि हितचिंतक गमावला आहे.’
Bahut dukhad Samachar hai ki Hamare Sabke Pyare Arvind bhai (Ravan of Ramayan) Ab Hamare bich Nahin Rahe? Bhagwan Unki Atma ko Shanti De…I am speechless I lost father figure, my guide, well wisher & gentleman … ?? pic.twitter.com/RtB1SgGNMh
— Sunil lahri (@LahriSunil) October 6, 2021
सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाने अरविंद त्रिवेदीचा रावण म्हणून फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘त्यांच्या कुटुंबाला मनापासून संवेदना. ते खूप छान व्यक्ती होते.’
View this post on Instagram
अनेक सेलिब्रिटींनी अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली वाहिली
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अरविंद त्रिवेदी यांना श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले की, ‘प्रसिद्ध रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अभिनेता अरविंद त्रिवेदी जी यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याचे जाणून अतिशय दुःख झाले. त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना माझी मनापासून संवेदना.’
Sad to know about the demise of well known theatre,tv & film actor #ArvindTrivedi ji due to massive heart attack. My heartfelt condolences to his entire family & near ones. ॐ शांति ! ??? pic.twitter.com/4UOHPrvZEd
— Ashoke Pandit (@ashokepandit) October 6, 2021
चित्रपट अभिनेत्यांशिवाय गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनीही अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हर्ष संघवी यांनी लिहिले की, ‘अरविंद त्रिवेदी जी यांचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले, जे रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या रामायणाचे हे पात्र नेहमी लक्षात राहील. ओम शांती’
Sad to hear about the demise of #ArvindTrivedi ji, who is best known for his portrayal of Raavan in Ramayana. His role in Ramayana will always be remembered.
Om Shanti ? pic.twitter.com/agRvnbxPXY
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) October 6, 2021
अरविंद त्रिवेदी यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्याची प्रकृती इतकी खराब झाली की, त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते, ज्यामुळे रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. टीओआयनुसार, ही माहिती अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
हेही वाचा :
भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या लेकीने घेतला मोठा निर्णय, ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल!