अवनीत कौर हिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले कालच तुनिशा शर्मा…
तुनिशा शर्माच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले असून शीजान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या पार्थिवावर काल मुंबईमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तुनिशा शर्माच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले असून शीजान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. 24 तारखेला तुनिशा हिने आत्महत्या केली. शीजानसोबत तिचे ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये असल्याचे तिच्या आईने सांगितले.
आता तुनिशा शर्मा हिची मैत्रिण आणि अभिनेत्री अवनीत कौर चर्चेत आलीये. अवनीत कौर ही तुनिशा शर्मा हिच्या अंत्यसंस्काराला पोहचली होती. यावेळी अवनीत कौर रडताना देखील दिसली.
View this post on Instagram
नुकताच अवनीत कौर हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हाच व्हिडीओ पाहून आता नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. तुनिशा शर्मा हिच्या अंत्यसंस्कारच्या वेळी रडणारी आता इतकी जास्त आनंदी कशी हा प्रश्न युजर्स विचारताना दिसत आहेत.
अवनीत कौर हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती घोड्यावर फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे देखील तिने अगोदरच स्पष्ट केले आहे. परंतू या व्हिडीओसोबत तिने आनंदी असल्याचे काही इमोजी शेअर केले आहेत.
View this post on Instagram
एका युजर्सने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, तुनिशा शर्मा हिच्या निधनाचे दु:ख संपले, काल रडत होती आणि आज लगेचच हॅप्पी कशी? दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच तू अभिनेत्री आहेस…
अवनीत कौर हिचा हाच व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजूनही तुनिशाच्या चाहत्यांना तिने आत्महत्या केली यावर विश्वास बसल नाहीये.