Bade Achhe Lagte Hain 2: नकुल मेहता-दिशा परमारच्या ‘कंडोम’ सीनवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
'बडे अच्छे लगते है' या मालिकेचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन (Bade Achhe Lagte Hain 2) प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) मुख्य भूमिका साकारत आहेत.
‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन (Bade Achhe Lagte Hain 2) प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या एका एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या टीझरवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. पहिल्या सिझनप्रमाणेच यामध्येही पात्रांची नावं ही प्रिया आणि राम हीच आहेत. या दोघांमधील कंडोमच्या दृश्यावरील हा प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या प्रोमोमध्ये रामचा (नकुल मेहता) मित्र प्रियासाठी (दिशा परमार) एक पार्सल घेऊन येतो. या पार्सलमध्ये प्रियाला औषधांऐवजी कंडोम मिळतं. याच दृश्यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
‘बडे अच्छे लगते है २’ या मालिकेत नुकताच होळीचा एपिसोड पार पडला. शिवीनाने बनवलेला भांग प्यायल्यानंतर प्रियाला डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशातच रामचा मित्र अजय हा त्याच्यासाठी एक खास पार्सल घेऊन येतो आणि तो ते प्रियाकडे सोपवतो. तुझ्या पतीने हे ऑर्डर केलंय, असं तो तिला खोटं सांगतो. प्रियाला ते डोकेदुखीचं औषध वाटतं, मात्र त्यात कंडोमचं पॅकेट असतं. यामुळे प्रिया आणि राम यांच्यामध्ये पुन्हा गैरसमज निर्माण होतो. रामच्या संवादामुळे प्रियाच्या मनातील संभ्रम आणखी वाढू लागतो. या दोघांमधील मजेशीर नोक-झोक प्रेक्षकांना या प्रोमोमध्ये पहायला मिळतो.
मालिकेचा प्रोमो-
Sar dard bhagaane ke chakkar mein, Ram ko hone wala hai aur sar dard! Dekhiye #RayaKaSafar #BadeAchheLagteHain2, aaj raat 8 baje, sirf Sony par.#BALH2 @ektarkapoor @nakuulMehta @disha11parmar pic.twitter.com/vY2rIxJzbU
— sonytv (@SonyTV) March 31, 2022
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
Haaye tauba,I’m gonna get fired at work for rolling on the floor laughing#BadeAchheLagteHain2 pic.twitter.com/sc1iW9R6nh
— MultipleMadness (@MadnessMultiple) March 31, 2022
I can’t stop laughing looking at this especially at our confidence ki dukaan Mr Ram kapoor @NakuulMehta &@disha11parmar how did you manage to say this without cracking up ? A big thank you for this much needed laughter riot #BadeAchheLagteHain2
— KS (@iscreamcookiess) March 31, 2022
या प्रोमोवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘हा प्रोमो पाहून मला इतकं हसायला येतंय, की कदाचित आता मला कामावरूनच काढून टाकतील’, असं एकीने म्हटलंय. तर ‘राम कपूरचा आत्मविश्वास पाहून मी लोळून हसतेय’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरअंतर्गत एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली आहे. 2011 मध्ये ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये साक्षी तंवर आणि राम कपूर यांनी प्रिया आणि रामच्या भूमिका साकारल्या होत्या. याच मालिकेचा हा दुसरा सिझन वेगळ्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हेही वाचा:
अपघातात मलायकाच्या कपाळाला दुखापत; प्रकृतीविषयी बहीण अमृताने दिली माहिती