फक्त ‘या’ अटीवर भारती सिंह करणार दुसऱ्या बाळाचे प्लानिंग, कॉमेडियनची अट ऐकून व्हाल हैराण
हर्ष आणि भारतीचा मुलगा लक्ष्य अर्थात आपल्या सर्वांचा आवडता गोला याचीही झलक भारती आणि हर्ष ब्लाॅगमध्ये दाखवतात.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंह हिच्या आजूबाजूला कायमच हलके फुलके वातावरण असते. भारती सिंहाचा व्हिडीओ ब्लाॅग बघितल्यावर तर कितीही टेन्शन असले तरीही पोट धरून हसल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून भारती आणि हर्ष आपल्या चाहत्यांना व्हिडीओ ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याच्या अपडेट देत असतात. शिवाय हर्ष आणि भारतीचा मुलगा लक्ष्य अर्थात आपल्या सर्वांचा आवडता गोला याचीही झलक भारती आणि हर्ष ब्लाॅगमध्ये दाखवतात.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा गोला याला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. भारती गोल्या विषयीचे सर्व अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच भारतीने व्हिडीओ ब्लाॅगमध्ये दुसऱ्या बाळाच्या प्लानिंग विषयी अत्यंत मोठे विधान केले आहे. भारतीचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण नक्कीच झालेत.
View this post on Instagram
भारती सिंह व्हिडीओ ब्लाॅगमध्ये म्हणाली की, काहीजण सातत्याने विचारत आहे की, दुसऱ्या बाळाचे प्लानिंग कधी करणार? माझी पण इच्छा आहे की, बाळाचे प्लानिंग करावे. मात्र, मला मुलगी हवी आहे…मला जर गॅरंटी मिळत असेल की, माझे दुसरे बाळ ही मुलगीच असेल तर मी प्लानिंग करण्यास तयार आहे.
भारती पुढे म्हणाली की, मी कितीतरी मुलींचे कपडे, हेयर बेल्ट, क्लिप्स, फ्रॉक हे सर्व घेऊन ठेवले होते. फक्त मला गॅरंटी हवी की, मला मुलगीच होणार तर मी लगेचच दुसऱ्या बाळाचे प्लानिंग करण्यास तयार आहे. आलिया भट्टला मुलगी झाल्यानंतर भारती सिंहने आलिया भट्टचे अभिनंदन केले होते.