Bigg Boss 15 | ‘माझी आई-बहिण बाथरूममध्ये असती तर…’, प्रतिक सहजपालच्या ‘त्या’ कृत्यावर भडकला सलमान खान!

‘बिग बॉस 15’ची सुरुवात दणक्यात झाली आहे आणि या सीझनमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’चा स्पर्धक असलेला प्रतिक सहजपाल वर्चस्व गाजवत आहेत. प्रतिक पहिल्या दिवसापासून जंगलवासींना लक्ष्य करत आहे आणि त्यांच्यावर राग काढत असल्याचे दिसते.

Bigg Boss 15 | ‘माझी आई-बहिण बाथरूममध्ये असती तर...’, प्रतिक सहजपालच्या ‘त्या’ कृत्यावर भडकला सलमान खान!
Bigg boss 15
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 11:01 AM

मुंबई : ‘बिग बॉस 15’ची सुरुवात दणक्यात झाली आहे आणि या सीझनमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’चा स्पर्धक असलेला प्रतिक सहजपाल वर्चस्व गाजवत आहेत. प्रतिक पहिल्या दिवसापासून जंगलवासींना लक्ष्य करत आहे आणि त्यांच्यावर राग काढत असल्याचे दिसते. पण, अलीकडेच, त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे, प्रतिक सहजपालने काहीतरी केले, ज्यामुळे त्याला केवळ कुटुंबातील सदस्यांच्याच नव्हे, तर प्रेक्षकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. आणि आता असे दिसते आहे की, प्रतीक सहजपाल या वीकेंड का वार मध्ये होस्ट सलमान खान याच्याकडून खूप बोलणी खाणार आहे.

‘बिग बॉस 15’च्या पहिल्या ‘वीकेंड का वार’चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात शोचा होस्ट सलमान खान प्रतिक सहजपालची शाळा घेताना दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान प्रतीक सहजपाल आणि विधी पंड्या यांच्यामध्ये घडलेल्या बाथरूमच्या कृत्यावर बोलताना दिसत आहे आणि प्रतिकवर चिडताना दिसत आहे. ज्यावरून दिसून येते की, सलमान खान बाथरूमच्या घटनेमुळे खूप रागावला आहे.

सलमानची आगपाखड

प्रतिक सहजपालकडे बोट दाखवत सलमान खान म्हणतो की, ‘जर कोणी सांगितले असते की माझी आई आणि बहीण बाथरूममध्ये आहेत, तरी मी खेळासाठी ते केले असते का? म्हणजे आई आणि बहीणीपेक्षा खेळ अधिक महत्वाचा आहे का? विधीला हवं तर ती आता काहीही करू शकली असती. जर त्याजागी माझी आई किंवा बहीण असती, तर मी तुला…’ काही वापरकर्ते असा दावा करत आहेत की, सलमान खानने बाथरूम घडलेल्या या घटनेबद्दल प्रतिक सहपालला फटकारले आहे.

नेमकं काय झालं?

वास्तविक, प्रकरण असे आहे की, स्पर्धक विधी पंड्या गार्डन एरियातील वॉशरूममध्ये आंघोळ करत होती आणि या दरम्यान प्रतीक सहजपालने बाहेरून वॉशरूमच्या दाराची कडी तोडली. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर विधीने करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुशाली आणि इतर सर्वांकडे याची तक्रार केली. घरातील सदस्यांना प्रतिकवर राग आला आहे. एवढेच नाही तर प्रतिक सहजपालच्या या कृत्यामुळे प्रेक्षकही खूप संतापले आहेत.

तेजस्वीने घेतली विधीची बाजू

विधीच्या या लढाईत तेजस्वी प्रकाशही तिला साथ देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहू शकतो की, तेजस्वी प्रतिकला सांगते की, तुझा हेतू बरोबर असला, तरी असे काही करणे योग्य नाही. ती म्हणाली की, “ही गोष्ट कोणत्याही मुलीसाठी खूप भीतीदायक आहे.” कुटुंबातील सदस्य असे प्रश्न विचारतात तेव्हाही प्रतीक तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तो म्हणतो की वॉशरूमच्या आत कोणी आहे की, नाही याची त्याला पर्वा नाही. तो फक्त खेळ खेळत आहे.

प्रतिकने माफी मागण्यास दिला नकार

प्रतिकच्या उत्तराने करण कुंद्रा खूप नाराज होताना दिसणार आहे. वास्तविक, एमटीव्हीच्या एका रिअॅलिटी शोमध्ये करण प्रतीकचा मार्गदर्शक होता. म्हणूनच प्रतिक त्याचा खूप आदर करतो. त्यामुळे प्रतिकची ही वृत्ती पाहून करण त्याच्यावर खूप रागावेल आणि तो त्याला एक चेतावणी देईल आणि म्हणेल, त्याने भविष्यात कोणत्याही मुलीशी असे वागू नये. पण प्रतिक या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष करेल. तो म्हणेल की, त्याला या सर्व गोष्टींची पर्वा नाही. एवढेच नाही तर यासाठी तो माफीही मागणार नाही.

हेही वाचा :

उषा मंगेशकरांचं भोजपूरी गाणं ऐकलात का? ऐन नवरात्रोत्सवात बिहारमध्ये धूमाकुळ

Video | आर्यन खान आणि शाहरुख खानची गळाभेट झाली? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.