Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!

‘बिग बॉस 15’ने (Bigg Boss 15) शोमध्ये ट्विस्टची घोषणा केली आहे आणि या घरात तीन नवे वाईल्ड कार्ड स्पर्धक आणले आहेत. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मराठी अभिनेता अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale), अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) आणि देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) यांची घरात एन्ट्री होणार होती.

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!
Abhijeet Bichukale
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 10:41 AM

मुंबई : ‘बिग बॉस 15’ने (Bigg Boss 15) शोमध्ये ट्विस्टची घोषणा केली आहे आणि या घरात तीन नवे वाईल्ड कार्ड स्पर्धक आणले आहेत. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मराठी अभिनेता अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale), अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) आणि देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) यांची घरात एन्ट्री होणार होती.

परंतु, आता त्यांच्या प्रवेशास विलंब होत आहे. कारण स्पर्धक अभिजीत बिचुकलेंमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत आणि आता त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. रश्मी आणि देवोलिनाने त्यांच्यासोबत ‘वीकेंड का वार’ एपिसोड देखील शूट केल्यामुळे,  त्या दोघी देखील क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यांची एंट्री पुढे ढकलण्यात आली आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले?

अभिजीत बिचुकले यांची ओळख कवी मनाचे नेते तसेच राजकारणी म्हणून आहे. दीड वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात केलेल्या एन्ट्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राला त्यांची चांगलीच ओळख झाली आहे. आता हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून केलेल्या पदार्पणामुळे बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यातील सर्वच निवडणुका लढवल्या असल्याने ते चर्चेत आहेत. एवढेच काय तर त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी देखील निवडणूक लढवली होती.

‘बिग बॉस’लाही ‘बिचुकलें’ची भुरळ!

खुद्द ‘बिग बॉस 15’च्या ट्विटर हँडलवरुन त्यांची ओळख करुन देताना ‘अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री’ अशी करुन देण्यात आली आहे. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस 15’चा होस्ट आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी बिचुकलेंची ओळख करुन दिली आहे. ‘आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम’ असं बिचुकले म्हणतात. त्यावर मांजरेकर ‘यू वाँट टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ अशी पुस्ती जोडताना प्रोमोमध्ये दिसतात. त्यावर बिचुकलेंच्या होकारानंतर ‘अभी बोल क्या करेगा तू’ असा सवाल मांजरेकर सलमानला विचारतात. त्यावर सलमानही चक्रावून गेलेला दिसतो.

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही. यासाठीच ख्यातकीर्त असलेले बिचुकले सुरुवातील स्थानिक पातळीवर फेमस होतेच. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यामुळे त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि आता ते अधिकच चर्चेचा विषय ठरु लागले.

हेही वाचा :

Happy Birthday Roopa Ganguly | महाभारतातील ‘ते’ दृश्य साकारताना धायमोकलून रडल्या रूपा गांगुली, रिटेक न घेता पूर्ण झालं चित्रीकरण!

Happy Birthday Rakhi Sawant | अवघ्या 50 रुपयांसाठी राखी सावंतने अंबानींच्या लग्नात वाढपी म्हणून काम केले, वाचा ड्रामा क्वीनच्या संघर्षाची कहाणी…

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.