Bigg Boss 16 | अब्दु रोजिक याच्यानंतर बिग बाॅसच्या घरातील हा स्पर्धेक बाहेर, चाहत्यांना मोठा झटका
अब्दु रोजिक बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडून काही तास उलटले नाहीत तोपर्यंतच बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना अजून एक मोठा झटका बसणार आहे.
मुंबई : काही कारणामुळे अब्दु रोजिक याने बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातून निरोप घेतलाय. अब्दू बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. अब्दु बिग बाॅसमधून बाहेर जाताना शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, सुंबुल ताैकीर आणि निम्रत काैर यांना अश्रू रोखणे देखील अवघड झाले होते. शिव ठाकरे, साजिद खान आणि एमसी तर ढसाढसा रडताना दिसले. यावेळी शिव ठाकरे म्हणाला होता की, मला काल रात्री कानामध्ये अब्दूने जाणार असल्याचे सांगितले होते. परंतू इतक्या लवकर तो जाईल, हे माहिती नव्हते. अब्दू रोजिक बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याला वाईट वाटत आहे. अब्दू गेल्याने मंडळीतील सर्वच सदस्य दु:खी आहेत.
अब्दु रोजिक बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडून काही तास उलटले नाहीत तोपर्यंतच बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना अजून एक मोठा झटका बसणार आहे. आता घरातील महत्वाचा एक स्पर्धेक बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार आहे.
साजिद खान हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर बाहेर मोठा हंगामा झाला होता. अनेक अभिनेत्रीने साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात पाहून रोष व्यक्त करत एक मोहिमच साजिद खान आणि बिग बाॅसच्या विरोधात सुरू केली होती.
शर्लिन चोप्रा हिने तर याप्रकरणात सलमान खान याला देखील ओढले होते. साजिद खान याला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्याची मागणी केली होती. आता साजिद खान हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार आहे.
साजिद खान याच्या एका चित्रपटाचे काम असल्याने तो बिग बाॅसच्या घराचा निरोप घेणार आहे. यावेळी साजिद खान हा घरातील सर्व सदस्यांची माफी मागत म्हणत आहे की, मी घरामध्ये ज्यांना कोणाला भांडलो…किंवा आपल्यामध्ये काही वाद झाला असेल तर मी माफी मागतो.
सोशल मीडियावर बिग बाॅसचा एक प्रोमो व्हायरल होतोय. या प्रोमोमध्ये साजिद खान हा रडताना देखील दिसत आहे. साजिद खान बिग बाॅसच्या घरातून बाहेर जात असल्याने सर्वचजण रडताना दिसत आहेत.
मंडळीमधून अगोदर अब्दू रोजिक आणि आता साजिद खान बाहेर पडणार असल्याने मोठा धक्का शिव ठाकरे, स्टॅन, सुंबुल आणि निम्रतला बसला आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रियंका चाैधरी म्हणाली होती की, मंडळीमधील कोणीच बेघर होत नाहीये आणि आता थेट दोनजण बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने चाहते प्रियंका चाैधरीला हिला टार्गेट करत आहेत.