Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांना शिव ठाकरे, एमसी स्टॅनला टार्गेट करणे पडले महागात
बिग बाॅस १६ मधून आता टीना दत्ता बेघर झालीये. फिनालेला काही दिवस शिल्लक असताना टीना दत्ता बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे.
मुंबई : बिग बाॅस १६ मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. फिनाले विक जवळ आल्याने बिग बाॅसच्या (Bigg Boss 16) घरातील सदस्यांमध्ये एक स्पर्धा बघायला मिळत आहे. विकेंडच्या वारमध्ये या आठवड्यात सलमान खान याच्याऐवजी फराह खान दिसली. फराह खान हिने देखील घरातील सदस्यांचा चांगला क्लास लावला. यावेळी फराह खान (Farah Khan) हिच्या निशाण्यार टीना दत्ता होती. टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी यांनी मागील आठवड्यामध्ये शालिन भनोट याला टार्गेट करत अनेक गोष्टी सुनावल्या होत्या. विशेष म्हणजे या दरम्यान शालिन भनोट याची तब्येत खराब होती. बिग बाॅस १६ मधून आता टीना दत्ता बेघर झालीये. फिनालेला काही दिवस शिल्लक असताना टीना दत्ता बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे.
टीना दत्ता, प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांचा एक ग्रुप होता. मात्र, आता यामधून टीना बेघर झाल्याने प्रियंका आणि अर्चना काय धमाल करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण नसताना देखील अनेकदा अर्चना घरातील सदस्यांसोबत भांडणे करताना दिसते.
#BiggBoss16 : Tomorrow’s Episode Promo
Finale ke ek hafte pehle action mein dikhe #ArchanaGautam &#PriyankaChaharChoudhary , #MCStan se hui fight … pic.twitter.com/BqD0RGjaqc
— BiggBoss24x7 (@BiggBoss24x7) January 28, 2023
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये प्रियंका चाैधरी, अर्चना गाैतम, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत.
टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम या एमसी स्टॅन आणि शिव ठाकरेला टार्गेट करत अनेक गोष्टी सुनावतात. यामुळे यांच्यामध्ये भांडणास सुरूवात होते.
Promo. ….??? Shaha bappa ree ladka khush ho gaya #SumbulTouqeerKhan || #BB16 || #BiggBoss16 || #SumbulSquad || pic.twitter.com/YGUIgwSoXy
— ? c̲r̲a̲z̲y̲g̲i̲r̲l̲? (@sumaanlove1) January 28, 2023
या भांडणामध्ये प्रियंका चाैधरी काहीतरी अपशब्द बोलते, जे ऐकून शिव ठाकरे याचा पारा चढतो आणि तो प्रियंकाला काय म्हटले…काय म्हटले हे विचारण्यास जातो…हे प्रोमोमध्ये दिसत आहे.
शिव ठाकरे याला सुरूवातीपासूनच प्रियंका चाैधरी ही टार्गेट करते. आता अर्चना गाैतम हिच्या निशाण्यावर एमसी स्टॅन हा आहे. आता पुढील काही दिवस बिग बाॅसच्या घरात का धमाका होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.