अर्चना गाैतम हिने केली हद्दपार, चक्क शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या डोळ्यात टाकली, सोशल मीडियावर संतापाची लाट

अर्चना गाैतम कधी काय करेल याचा अजिबातच नेम नाहीये. बिग बाॅसने (Bigg Boss) घरातील सदस्यांना एक टास्क दिलाय.

अर्चना गाैतम हिने केली हद्दपार, चक्क शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या डोळ्यात टाकली, सोशल मीडियावर संतापाची लाट
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:10 PM

मुंबई : बिग बाॅसचे १६ वे सीजन चांगलेच रंगात आले आहे. फिनाले विकसाठी काही दिवस शिल्लक असताना घरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. बिग बाॅसच्या घरातील वादग्रस्त खेळाडू म्हणून अर्चना गाैतम (Archana Gautam) हिचे नाव पुढे आले. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे याच्यासोबतच्या भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. यानंतर अर्चना गाैतम हिला बिग बाॅसच्या घराबाहेरही काढण्यात आले. सलमान खान (Salman Khan) याची याचे आर्शिवाद अर्चनावर असल्याने परत एकदा तिला घरात घेण्यात आले. यावेळी पुन्हा असे कधीच करणार नसल्याचे अर्चना गाैतम हिने सांगितले होते. परंतू अर्चना कारण नसताना घरातील काही सदस्यांना टार्गेट करत भांडते. अर्चना गाैतम कधी काय करेल याचा अजिबातच नेम नाहीये. बिग बाॅसने (Bigg Boss) घरातील सदस्यांना एक टास्क दिलाय. मात्र, या टास्कमध्ये अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी असे काही करतात की, हे पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत.

बिग बाॅसने घरातील सदस्यांचे दोन टीममध्ये विभाजन केले असून एका टीममध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर आहेत. दुसऱ्या टीममध्ये शालिन भनोट, प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम आहेत.

या टास्कमध्ये एक टीम दुसऱ्या टीमला टॉर्चर करणार आहे. यादरम्यान बजरवरील हात काहीही झाले तरीही काढायचा नाहीये. या टास्कची एक फेरी काल झालीये. एक तास प्रियंका चाैधरी, शालिन भनोट आणि अर्चना गाैतम यांनी बजरवरील सात काढले नव्हते.

नुकताच बिग बाॅसच्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर हे बजरला पकडून थांबले आहेत. अर्चना गाैतम ही शिव ठाकरेच्या टीमला टॉर्चर करण्यासाठी असे काही करते की ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो.

टॉर्चर करण्यासाठी अर्चना गाैतम ही चक्क निम्रत, शिव आणि एमसीच्या अंगावर हळद टाकते. या हळदीमध्ये मसाले देखील मिक्स केले आहेत. यामुळे शिव, निम्रत आणि एमसीच्या डोळ्यांमध्येही हळद जाते.

अर्चना गाैतम आणि प्रियंकाचे हे रूप पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण या टॉर्चर टास्कमध्ये शिव ठाकरे, निम्रत काैर किंवा एमसी स्टॅन यांनी प्रियंकाच्या टीमसोबत असे काहीच केले नव्हते.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हळद डोळ्यांमध्ये गेल्याने निम्रत काैर रडायला लागते. रिपोर्टनुसार अर्चना आणि प्रियंका हे कारणामे बघितल्यावर बिग बाॅस हा टास्कमध्येच थांबवण्याचे आदेश देतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.