थेट गळा पकडून मारहाण केली तरीही अर्चना गाैतमवर बिग बाॅसचे निर्माते मेहरबान, शिव ठाकरेच्या चाहत्यांनी केला गंभीर आरोप
बिग बॉस 16 मध्ये भेदभाव केला जातोय, असा आरोप सातत्याने सोशल मीडियावर केला जातोय.
मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’चा गेला आठवडा चांगलाच चर्चेत होता. बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. यामध्ये सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे या भांडणामध्ये अर्चना गाैतमने थेट शिव ठाकरेचा गळा पकडला. यानंतर हे सर्व प्रकरण प्रचंड तापले आणि बिग बाॅसने फक्त प्रेक्षकांना दाखवण्यासाठी अर्चनाला बाहेरचा रस्ता दाखवला. बिग बाॅसच्या घरात भांडणामध्ये हात उचलणे हा खूप मोठा गुन्हा मानला जातो.
बिग बॉस 16 मध्ये भेदभाव केला जातोय, असा आरोप सातत्याने सोशल मीडियावर केला जातोय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिव ठाकरेच्या अगोदर अर्चना गाैतम हिने गोरीला मारहाण केली होती. त्यानंतर बिग बाॅसने फक्त समज देत अर्चनाला समजावले. पण तिच्यावर काहीच कारवाई वगैरे केली नाही. अर्चना बिग बाॅसच्या घरातील प्रत्येक सदस्याला पर्सनल लाईफवर जात भांडते, तरीही बिग बाॅस अर्चनाला काहीच बोलत नाहीत.
The way #PriyankaChaharChoudhary is taking a stand for #ArchanaGautam by putting logical arguments is exemplary!
This woman is on fire ?
Chiv’s game fully decoded by Pri!
PRIYANKA OWNS BB16#BiggBoss16 pic.twitter.com/JgzZXMWntq
— Ayra (@ayratastic) November 12, 2022
शिव ठाकरे सोबतच्या एका भांडण्यात अर्चना त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बरेच काही बोलते, तरीही बिग बाॅस अर्चनाला काहीच बोलताना दिसले नाहीत. त्यानंतर एका भांडणात अर्चना थेट शिव ठाकरेचा गळा पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न करते. या प्रकरणात बिग बाॅस अर्चनाला घराच्या बाहेर काढल्याचा फक्त दिखावा करतात.
विकेंडच्या वारला सलमान खान शिव ठाकरेच्या चुका दाखवत अर्चना गाैतमला परत एकदा बिग बाॅसच्या घरात पाठवतो. मात्र, शिव ठाकरेचा गळा दाबून देखील बिग बाॅस अर्चनाला घरात कसे प्रवेश देऊ शकतात, हा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. बिग बाॅसने आतापर्यंत अर्चनाच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालण्याचे काम केले आहे. अर्चनाने कोणाला मारहाण देखील केली तरीही बिग बाॅस तिला घराच्या बाहेर काढत नाहीत. यामुळे आता सोशल मीडियावर सलमान खान आणि बिग बाॅसच्या विरोधात संपाताची लाट निर्माण झालीये.