Bigg Boss 16 | अर्चना गाैतमने केली हद्दपार, घरातील सदस्यांच्या जेवणाच्या ताटामधून…
अर्चना नेहमीच कारण नसताना बिग बाॅसच्या घरात वाद घालताना दिसते. आता तर अर्चनाने हद्दपार केली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस 16 मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गाैतमचे नाव पुढे येत आहे. अर्चना नेहमीच कारण नसताना बिग बाॅसच्या घरात वाद घालताना दिसते. आता तर अर्चनाने हद्दपार केली आहे. टीव्हीवर दिसण्यासाठी अर्चना कोणता तरी मुद्दा घेते आणि त्यावर वाद घालताना दिसते. विशेष म्हणजे तिच्या अशा वागण्यामुळे तिचे मित्र देखील तिची साथ देत नाहीत. आता तर अर्चनाने चपातीवरून वाद घातला आहे.
नुकताच सोशल मीडियावर बिग बाॅस 16 चा एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अर्चना घरातील सदस्यांच्या चपाती प्लेटमधून उचलून घ्यायला सांगते.
साैंदर्या शर्मा सर्वांसाठी चपात्या बनवत आहे. त्याचवेळी तिथे अर्चना गाैतम येते आणि मला ताज्या पिठाच्या चपात्या पाहिजे असल्याचे साैंदर्याला म्हणते. हे तर रात्रीचे शिळे पीठ दिसत आहे.
यावर साैंदर्या म्हणते की, बहुतेक सर्व एकत्र झाले आहे. त्यानंतर अर्चनाचा नेहमीप्रमाणेच पारा चढतो आणि ती म्हणते की, मला काहीच माहिती नाहीये. मला ताज्या पिठाच्याच चपात्या हव्या आहेत.
साैंदर्या निम्रतला बोलावते आणि म्हणते की, हिला ताज्या पिठाच्या चपात्या हव्या आहेत. ज्या घरातील काही सदस्यांनी घेतल्या आहेत, मी तर हिला त्यांच्या ताटामधील आणून देऊ शकत नाही. कारण हे चुकीचे आहे.
अर्चना जोरदार वाद घालते. त्यानंतर निम्रत शिव, अब्दू, साजिद आणि स्टॅनच्या ताटामधून तिला चपात्या आणून देते. निम्रतला हे चुकीचे वाटते. परंतू अर्चना मला ताज्या पिठाच्याच चपात्या हव्या आहेत मी शिळ्या पिठाच्या चपात्या खाणार नाही बोलते.
हा सर्व प्रकार शिव ठाकरेला आणि घरातील इतर सदस्यांना आवडत नाही. कारण हे सर्व लोक जेवण करत असताना यांच्या ताटामधून चपात्या घेतल्या जातात. यानंतर अर्चना आणि शिवमध्ये मोठा हंगामा होतो. यावेळी अर्चनाला शिव म्हणतो की, कर्मा…