मुंबई : बिग बाॅसच्या घरात राहायचे असेल तर तुम्हाला लव्ह अॅंगल तयार केल्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे अनेक स्पर्धेकांना कायम वाटते. हाच प्रयत्न बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) मध्ये टीना दत्ता आणि शालिन भनोट हे करताना दिसले. परंतू यामध्ये हे दोघे स्वत: च फसले. नुकताच बिग बाॅसच्या घरात फॅमिली वीकमध्ये टीना दत्ता हिची आई आणि शालिन भनोट याची आई आली होती. यावेळी टीना दत्ता हिने तिच्या आईला विचारले की, खरोखरच शालिन भनोट माझ्यावर प्रेम करतो का? यावर टीनाच्या आईने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितली की, अजिबात नाही. बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना आणि बाहेर प्रेक्षकांना सर्वांनाच टीना दत्ता आणि शालिन भनोट यांची लव्ह स्टोरी (Love story) सुरूवातीपासूनच फेक दिसते.
न्यू इअर पार्टीमध्ये टीना दत्ता हिने डान्स करताना शालिन भनोट याच्यासोबत असे काही केले की, सलमान खान चक्क टीना दत्ता हिच्यावर भडकला होता. यावेळी सलमान खान याने टीना दत्ता हिचा चांगलाच क्लास लावला.
सर्वांनाच वाटते की, टीना आणि शालिन बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी फेक लव्ह करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून अनेकदा हे स्पष्ट देखील झाले आहे.
नुकताच बिग बाॅसच्या घरात काही पाहुणे आले होते. यावेळी त्यांनी शालिन आणि टीना यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल काही सडेतोड प्रश्न विचारले, हे प्रश्न ऐकताच शालिन आणि टीना देखील चक्रावले.
दिबांग यांनी टीना आणि शालिन यांना म्हटले की, तुमची लव्ह स्टोरी ही प्लास्टिकच्या फुलासारखी आहे. प्लास्टिकच्या फुलाचा जसा काही सुगंध येत नाही तशीच. हे ऐकल्यावर टीना आणि शालिन शांत बसतात.
सलमान खान याने देखील यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, तुमची लव्ह स्टोरी फेक असल्याने स्पष्ट दिसत आहे. टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वीच गेली होती आणि परत घरात आलीये.
या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये असलेली श्रीजिता डे ही बेघर होणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि टीनामध्ये मैत्री दिसत आहे. मात्र, ही मैत्री किती दिवस टिकेल हे सांगणे थोडे अवघड आहे.