Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’ मधील हा स्पर्धक या व्यक्तीला करतोय मिस…
तजाकिस्तानचा अब्दू बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे अब्दू बिग बॉस 16 मधील सर्वात चर्चित स्पर्धक आहे. फुल मस्ती अब्दू बिग बॉस 16 च्या घरात करताना दिसतोय.
मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) चांगलाच रंगात आलाय. 16 व्या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातापासूनच क्रेझ आहे. इतकेच नव्हे तर निर्माते देखील या सीजनला खास बनवण्यासाठी प्रयत्न करतायंत. यंदा बिग बॉसच मैदानात उतरल्याने यावेळेच्या सीजनमध्ये (Season) काहीतरी खास होणार हे नक्कीच. बिग बॉसने (Bigg Boss) पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत पंधरा वर्षांची परंपरा खंडित पाडत सकाळी लावण्यात येणारे गाणे बंद केले. बिग बॉस 16 मध्ये सहभागी स्पर्धक अब्दू सध्या प्रचंड चर्चेत आहे.
View this post on Instagram
तजाकिस्तानचा अब्दू बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे अब्दू बिग बॉस 16 मधील सर्वात चर्चित स्पर्धक आहे. फुल मस्ती अब्दू बिग बॉस 16 च्या घरात करताना दिसतोय. अब्दूला हिंदी भाषा व्यवस्थित येत नसल्याने त्याची मदत करण्याच्या सूचना बिग बॉसने साजिद खानला दिल्या आहेत. साजिद आणि अब्दूमध्ये चांगली बाॅन्डीग झाल्याचे दिसत आहे.
अब्दू हा बिग बॉस 16 मधील सर्वात कमी उंचीचा स्पर्धक आहे. अब्दूची उंची इतकी जास्त कमी आहे की, त्याला बिग बॉसच्या घराचे दरवाजे देखील उघडता येत नाहीत. मात्र, आता अब्दूला त्याच्या आईची प्रचंड आठवण येतंय. अब्दू टीनाला सांगतो की, मला माझ्या आईची खूप जास्त आठवण येतंय. साजिद खाननंतर बिग बॉसच्या घरात अब्दू टीनाच्या जवळ आणि तिच्यासोबत मस्ती करतो.