Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरीचे हे बोलणे ऐकून शालिन भनोट याचा चढला पारा, थेट

नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यामध्ये घरात नाॅमिनेशन टास्क पार पडलेला दिसतोय.

Bigg Boss 16 | प्रियंका चाैधरीचे हे बोलणे ऐकून शालिन भनोट याचा चढला पारा, थेट
| Updated on: Jan 05, 2023 | 6:14 PM

मुंबई : बिग बाॅस सीजन १६ मध्ये घरातील स्पर्धेक भांडताना दिसत आहेत. विषय कोणाचाही असो प्रियंका चाैधरी भांडण्यास कायमच तयार असते. अंकित गुप्ता हा बिग बाॅसच्या घरातून बेघर झाल्यापासून प्रियंका चाैधरी हिने आपला स्वत: चा एक ग्रुप तयार केलाय. यामध्ये प्रियंका, शालिन, टीना, श्रीजिता हे आहेत. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यामध्ये घरात नाॅमिनेशन टास्क पार पडलेला दिसतोय. या टास्कमध्ये प्रियंकाला शालिन आणि टीना वाचवत नाहीत. यावर प्रियंका आणि शालिनचे बोलणे सुरू होते. यादरम्यान प्रियंका शालिन याला असे काहीतरी बोलते की, शालिन म्हणतो की, हो…मला नाॅमिनेशनची भीती वाटते…

शालिन आणि प्रियंकामधील वाद इतका जास्त वाढतो की, शालिन हा टेबलवर ठेवलेले साहित्य फेकून देतो. मात्र, या वादाचे मुळ कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाहीये. हा प्रोमो व्हायरल होताना दिसत आहेत.

टीना दत्ता हिने बिग बाॅसच्या घरात चोरी केली होती. टीनाने चाॅकलेट चोरले होते. यानंतर बिग बाॅस टीनाला म्हणतात की, तू जे काही चोरले आहे ते परत त्याचठिकाणी आणून ठेव…

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका, टीना आणि शालिनमध्ये मैत्री बघायला मिळत होती. मात्र, यांची मैत्री फार काळ टिकू शकली नसल्याचे व्हायरल होणाऱ्या प्रोमोमधून स्पष्ट दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन आणि अर्चना गाैतम यांच्यामध्येही मोठा वाद झालाय.

अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घराचा नवा कॅप्टन झालाय. मात्र, टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी यांनी त्यांची मनमानी करण्यास सुरूवात केली आहे. टास्कमध्ये जिंकलेले राशन कॅप्टन रूममध्ये ठेवण्यास प्रियंका आणि टीनाविरोध करताना दिसल्या.